मुंबई, 22 फेब्रुवारी: प्रत्येक दिवस सारखा नसतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
मेष - अतिरिक्त खर्च टाळा, जोडीदाराच्या निर्णयात हस्तक्षेप करणं टाळा, प्रियकराच्या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करा. आठवड्याभराची प्रलंबित कामं पूर्ण करा.
वृषभ- उदासीनता बाळगू नका. प्रेमाचा मार्ग नवं वळण घेईल. अखेरच्या क्षणी योजनांमध्ये बदल होतील. वैवाहिक जीवनातील संतुलन बिघडेल.
मिथुन - खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक फायदा होईल. सकारात्मक विचार आणि प्रयत्नांमुळे यशाचे मार्ग खुले होतील.
कर्क - दुसऱ्यांवर टीका करण्यात वेळ वाया घालवू नका. आर्थिक नियोजन करणं फायद्याचं ठरेल. अफवांवर विश्वास ठेवू नका.
सिंह - खर्चात अनपेक्षित वाढ होईल. आजचा दिवस तणावाचा असेल. जुन्या भेटीगाठी होतील. गप्पांमधून आनंद मिळेल.
कन्या - गुंतवणूक करताना काळजीपूर्व करा. नुकसान टाळण्यासाठी संकोच करू नका. आजचा दिवस आपल्या इच्छेप्रमाणे गेला नाही तर संयम सोडू नका. छंद जोपासल्यानं समाधान मिळेल.
तुळ - आरोग्याची काळजी घ्या. आज आपल्याला कामात सहकारी आणि कुटुंबियांचं प्रोत्साहन मिळेल. दीर्घ कालावधीत कामाच्या संदर्भात केलेला प्रवास फायदेशीर ठरेल.
वृश्चिक - लांबचा प्रवास टाळा, आर्थिक नियोजन करा. कार्यालयात अनावश्यकपणे आपले पाय खेचले जातील. सुट्टीचा दिवस जोडीदारासोबत घालवला तर आनंदी वाटेल.
धनु - आपला आत्मविश्वास दृढ होईल. आज शक्यतो गुंतवणूक करू नये. बऱ्याच दिवसांपासून उद्भवलेल्या समस्यावर तोडगा काढाल.
मकर - आजचा दिवस मनोरंजन आणि करमणुकीत घालवाल. अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
कुंभ - शरीर तंदुरुस्त ठेवण्यसाठी व्यायाम करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रलंबित कामं मार्गी लागतील.
मीन - नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवा. आपले जुने विचार आपली प्रगती खुंटतील. आर्थिक समस्या जाणवतील. कुटुंब आणि मित्रांसोबत पुरेसा वेळ घालवाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.