मुंबई, 16 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील आव्हानं कोणती याची पूर्णकल्पना आली तर सोडवणं अधिक सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष - निरोगी राहण्यासाठी जास्त खाणे टाळा आणि नियमित व्यायाम करा. प्रेमाच्या बाबतीत पार्टनरला दुखवू नका.
वृषभ- कुटुंबियांसोबत निवांत वेळ घालवा. वचनात अडकू नका. जोडीदाराचे प्रेम मिळेल.
मिथुन- आज आपले आरोग्य पूर्णपणे चांगले होईल. अंदाज हानिकारक असल्याचे सिद्ध होऊ शकते. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा.
कर्क- आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा. वाद-विवादांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल.
सिंह - आज आपला दिवस कंटाळवाणा जाईल. आर्थिक संकटातून आपली सुटका होईल. येणाऱ्या परिस्थितीचा पळ काढण्याऐवजी सामना करा.
कन्या- आर्थिक सुधारणा निश्चित आहे. प्रिय व्यक्तीचे दोष शोधण्यात वेळ वाया घालवू नका.
तुळ- मन निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आज गुंतवणूक करणं टाळावं.
वृश्चिक- कुटुंबियांसोबत वेळ घालवा आणि विश्रांती घ्या. आज आपल्याला आर्थिक लाभ होईल.
धनु- घरात तणावाचा सामना करावा लागेल. अचानक आणि आपात्कालीन तणावाचे बळी व्हाल.
मकर- भावनांवर नियंत्रण ठेवणं अवघड जाईल. आपल्या विचित्र वृत्तीचा लोकांना त्रास होऊ शकतो. हुशारीनं गुंतवणूक करा.
कुंभ- खाण्याकडे लक्ष द्या. वादामुळे घरात तणावाचं वातावरण असेल. समस्या सोडवण्यासाठी शांतपणे विचार करा.
मीन- आर्थिक स्थिती सुधारेल. मित्र आणि आप्तेष्टांसोबत साधलेल्या संवादातून आनंद मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
संपादन- क्रांती कानेटकर
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.