राशीभविष्य : धनु आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो आर्थिक फायदा

राशीभविष्य : धनु आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो आर्थिक फायदा

कसा असेल रविवारचा आपला दिवस जाणून घ्या 5 जुलैचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 05 जुलै : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि घडामोडींची चाहूल लागली तर आपल्याला त्या समस्यांवर तोडगा काढणं अधिक सोपं होऊन जातं. यासाठीच आजचा आपला दिवस कसा असेल जाणून घ्या.

मेष- आपला आत्मविश्वास आणि मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करा. जोडीदाराकडून सहकार्य न मिळाल्यानं निराशा होईल. मनोरंजनातून आपला वेळ छान जाईल.

वृषभ- आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. विद्यार्थ्यांनी करियरच्या दृष्टीनं प्रयत्नशील असायला हवं. घाईनं निर्णय घेऊ नका.

मिथुन- गर्भवती महिलांसाठी आजचा दिवस चांगला नाही. प्रिय व्यक्तीला पुरेसा वेळ न दिल्यास राग येऊ शकतो. आज आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं.

कर्क- व्यक्तीमत्त्व सुधारण्यावर भर द्या. आज गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं. कुटुंबातील आजचं वातावरण त्रासदायक वाटू शकतं.

हे वाचा-Lunar Eclipse 2020: वर्षातलं तिसरं चंद्रग्रहण आज, कुठे आणि कधी होणार जाणून घ्या

सिंह- प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येतील. जोडीदारासोबत बोलल्यानं आपल्याला वेळ मिळेल. ध्यान आणि चिंतन करणं आज आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.

कन्या- आज आपण शक्यतो वाद घालणं टाळावं. अचानक होणारी पगारवाढ आपला उत्साह द्विगुणीत करू शकते. जोडीदारासोबत वेळ घालवा.

तुळ- आजचा दिवस खूप चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं वाईट आहे.

वृश्चिक- घरगुती सुविधांवर लक्ष द्या. जोडीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका.

धनु- आर्थिक फायदा होईल. प्रवास आनंददायी ठरेल. जोडीदाराकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या.

हे वाचा-बाप रे! पुराच्या पाण्यानं शहराला वेढलं, टायरवर महिलेनं दिला गोंडस बाळाला जन्म

मकर - निर्णय घेण्याआधी नीट विचार करणं गरजेचं आहे. गुंतवणुकीआधी माहिती घ्या. आपल्या मनावरचा ताबा दुसऱ्याच्या हाती देऊ नका. मित्रासोबत संवाद साधा.

कुंभ- आर्थिक फायदा होईल. आज आपला उत्साह आणि उर्जा सर्वाधिक असेल. दीर्घकाळापासून असलेल्या समस्यांवर आज तोडगा निघेल. प्रेमाची कमतरता जाणवेल.

मीन- गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या नाहीत तर निराश होऊ नका. आज आपल्याला थकवा आणि ताण जाणवू शकतो. दिवसभर टीव्ही किंवा मोबाईलसमोर राहिल्यास डोळ्यांवर ताण येऊ शकतो.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 5, 2020, 7:43 AM IST

ताज्या बातम्या