मुंबई, 06 जानेवारी : प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद घेऊन येते तर कधी समस्यांचा डोंगर. आव्हानं कोणतं याची पूर्वकल्पना असेल तर तसं नियोजन करणं सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसं असेल आजचं आपलं राशीभविष्य.
मेष- आज आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
वृषभ- रागावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीचा विचार करा. आजचा दिवस आपल्याला फायदा मिळवून देणारा आहे. आपल्या भावना व्यक्त करणे आपल्याला कठीण जाईल.
मिथुन- आज आपलं कौतुक केलं जाईल. आर्थिक चणचण जाणवेल. आज आपल्याला खूप जास्त थकवा जाणवेल.
कर्क- नियमित व्यायाम करा ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहिल. तळलेलं-तुपकट खाद्यपदार्थ टाळा. आज आपल्याला चांगली संधी मिळेल त्याचं सोनं करा.
सिंह- आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करणं टाळा. आज आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
कन्या- आर्थिक व्यवहारात अडकण्यापासून सावध राहा. कायदेशीर बाबींमुळे ताण शक्य आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहारात अडकण्यापासून सावध राहा.
तुळ- स्वार्थी व्यक्तींपासून सावध राहा. आज मिळणारे आर्थिक लाभ पुढे ढकलले जाऊ शकतात. आज प्रिय व्यक्तीमुळे आपल्याला राग येऊ शकतो.
हे वाचा-जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांची कमाल! हळद, कडूनिंबपासून बनवले Sanitary pads
वृश्चिक- आर्थिक समस्यांमुळे आज आपल्या अडचणीत वाढ होऊ शकते. जोडीदाराच्या खराब आरोग्यामुळे आपल्या कामावर परिणाम होऊ शकतो.
धनु- मनात मांडे घालू नका तर प्रत्यक्षात स्वप्नांच्या दिशेनं पावलं उचला. वेगवेगळ्या विचारांमुळे आपण आणि आपल्या जोडीदारामध्ये वाद होऊ शकतो
मकर - आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. आज आपलं प्रेम मिळवण्यात आपण अपयशी ठराल. आजचा दिवस आपल्यासाठी खूप जास्त चांगला नाही.
कुंभ- खर्चामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आजचा दिवस प्रेमाच्या दृष्टीकोनातून खूप जास्त विवादास्पद असेल. कामाच्या आघाडीवर हा एक कठीण दिवस असू शकतो.
मीन- भावनांवर नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. शब्द जपून वापरा आणि आरोग्याची काळजी घ्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.