मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /राशीभविष्य : कर्क आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवा

राशीभविष्य : कर्क आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवा

मीन आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजची संध्याकाळ खूप सुंदर असेल.

मीन आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजची संध्याकाळ खूप सुंदर असेल.

मीन आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजची संध्याकाळ खूप सुंदर असेल.

मुंबई, 02 जानेवारी : कोणाचे स्टार्स आज चमकणार आणि कोणत्या राशीच्या लोकांना आज मिळणार शुभवार्ता. कोणत्या अडचणी येणार आणि कसा फायदा होणार सविस्तर वाचा आजचं राशीभविष्य.

मेष- पुरेशी विश्रांती न मिळाल्यानं आज आपल्याला खूप थकवा जाणवू शकतो. अचानक पैसे तुमच्याकडे येतील, जे तुमच्या खर्चाची आणि बिलासाठी पुरेसे असतील.

वृषभ- पोटदुखी आणि दातदुखीसारखे आजार आज डोकं वर काढणार आहेत. गुंतवणुकीतून आज आपल्याला पैसे मिळतील. आज आपल्याला चांगला अनुभव येईल.

मिथुन- प्रगतीमध्ये अडथळा आणत असलेल्या त्रासापासून मुक्त होण्याची वेळ आली आहे. प्रिय व्यक्तीसोबत आज वाद घालू नका. मानसिक शांती मिळवण्यासाठी आज नदी किंवा पार्क वॉक हा एक चांगला पर्याय असू शकतो.

कर्क- आज आपल्या रागामुळे आपला दिवस खराब जाईल. दिवसभर ताण असेल. कामाच्या ठिकाणी आपली निराशा होऊ शकते. जोडीदाराची मनस्थिती चांगली नसेल.

सिंह- आज आपल्याकडे वेळ शिल्लक राहिल. त्याचं योग्य नियोजन करा. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज कंटाळवणं वाटेल त्यामुळे आपली आवड आणि छंद जोपासण्यावर भर द्या.

कन्या- आरोग्य चांगलं राहिल, पैसे आणि वेळ खर्च करून नका त्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करा.

तुळ- दुसऱ्यांच्या कामात नाक खूपसण्याची वृत्ती घातक ठरू शकते. विनाकारण कुणाला सल्ला देऊ नका. प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगाला आहे.

हे वाचा-Lockdown चा सदुपयोग करत 4 बहिणींनी बनवला बोर्ड गेम, या कारणाने लगेच झाला हिट

वृश्चिक- आज आपलं आरोग्य निरोगी राहिल. घाईनं कोणताही निर्णय घेऊ नका. आज आपली दिशाभूल कऱण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

धनु- कामाचा ताण असूनही आरोग्य चांगलं राहिल. नातेवाईकांकडून आनंदवार्ता मिळेल. आजचा दिवस थोडा कठीण असू शकतो.

मकर - जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड करणं टाळा. आर्थिक गुंतवणुकीत अडकू नका. उशिरा बाहेर जाणं आणि अति खर्च करणं टाळा.

कुंभ- कामाचा ताण असेल आणि उधारी चुकती करणं गरजेचं आहे.

मीन- प्रगतीमध्ये अडथळे दूर होतील, गुंतवणुकीतून फायदा मिळेल. कामकाजात झालेल्या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. आज जर तुम्हाला खरोखरच फायदा हवा असेल तर इतरांची मते काळजीपूर्वक ऐका.

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope