राशीभविष्य : वृश्चिक आणि कुंभ राशीच्या व्यक्तींचा आज पार्टनरसोबत होऊ शकतो वाद

राशीभविष्य : वृश्चिक आणि कुंभ राशीच्या व्यक्तींचा आज पार्टनरसोबत होऊ शकतो वाद

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या 19 मेचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 17 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. समोर येणारी आव्हानं आणि चांगल्या घडामोडी याची पूर्वकल्पना असेल तर आपल्याला समस्यांचा सामना करणं अधिक सोपं जातं यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आत्मविश्वासाची पातळी वाढेल. मनोरंजनावर खर्च करणं टाळा. प्रेम आपल्यापासून दूर जाईल.

वृषभ- सकारात्मक वृत्तीचा परिणाम आपल्या भोवतीच्या लोकांवर होणार आहे. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका.

मिथुन- आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ झाल्यानं बचत करणं कठीण जाईल. भुतकाळातील काही गोष्टी आज पुन्हा डोकं वर काढू शकतात.

कर्क- ध्यान आणि योग शारीरिक आणि मानसिक फायद्यासाठी उपयुक्त ठरतील. आर्थिक सुधारणांमुळे आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करणे आपल्यासाठी सोपे होईल.

हे वाचा-वॉचमनची नोकरी करायचा हा बॉलिवूड सुपरस्टार, दोन वेळचं जेवण मिळणंही होतं कठीण

सिंह - दीर्घ आजाराकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा भविष्यात मोठी समस्या उद्भवू शकते. आपले खर्च वाढल्यानं आपल्यासाठी त्रासदायक ठरेल.

कन्या- गडबडीत निर्णय घेतल्यानं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यक्तीमत्त्व विकासाकडे लक्ष द्या. वेळ वाया घालवू नका.

तुळ- बऱ्याच काळापासून जाणवत असलेला ताण आणि थकवा दूर होईल. पार्टनरसोबत वाद झाल्यानं शांतता भंग होईल.

वृश्चिक- भावनांवर नियंत्रण ठेवा. पार्टनरच्या कामात हस्तक्षेप केल्यानं राग येईल. बॉसचा मूड चांगला असल्यानं वातावऱण चांगलं राहिल.

धनु- कुटुंबीयांसोबतत वेळ घालवा. आत्मविश्वास वाढल्यानं आज आपल्याला फायदा होईल.

मकर- आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करा. बुद्धीचा वापर करून घरगुती समस्या सोडवा. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा आणि धैर्यानं काम करा.

कुंभ- इतरांवर आपला वेळ आणि पैसा खर्च कराल. घाईगडबडीनं कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबत वाद होतील.

मीन- आज आपल्याला विश्रांतीची गरज आहे. स्वत:ला व्यक्त करण्यासाठी ही वेळ चांगली आहे.

हे वाचा-खूशखबर! कोरोनाविरोधातील लसीच्या ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा यशस्वी

संपादन- क्रांती कानेटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2020 08:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading