मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : धनु आणि वृषभ राशीच्या व्यक्तींना मिळू शकतो मोठा नफा

राशीभविष्य : धनु आणि वृषभ राशीच्या व्यक्तींना मिळू शकतो मोठा नफा

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार आव्हानांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार आव्हानांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार आव्हानांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 16 डिसेंबर : येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो कधी शुभ संकते घेऊन येतो तर कधी आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या कोणत्या येणार हे जर समजलं तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं जातं त्यामुळे जाणून घ्या आजचा आपला दिवस कसा असेल. मेष- योग आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी वेगवेगळे व्यायम करा. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका. रखडलेली कामं पूर्ण होतील. वृषभ- प्रेम, आशा, सहानुभूती, आशावाद आणि निष्ठा यासारख्या सकारात्मक भावना जाग्या करा. त्यातून आपल्याला प्रोत्साहित व्हाल आणि सकारात्मकता निर्णय होईल. गुंतवणूक आपल्याला महत्त्वपूर्ण नफा देईल. मिथुन- आर्थिक समस्या जाणवण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्ती आज आपल्यावर खूप रागवण्याची शक्यता आहे. सावधगिरी आणि समजूदारपणानं वागा. कर्क- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज आपल्याकडे पैसा कसा येईल याकडे लक्ष द्या. आज कोणत्याही वादात अडकण्यापासून टाळा. सिंह- एकटेपणाची भावना खूप वाईट आहे. जोडीदाराच्या स्वभावामुळे आज आपल्याला त्रास होऊ शकतो. कन्या- आर्थिक योजनांमध्ये अडकण्याचे टाळा, गुंतवणूकीत अत्यंत सावधगिरी बाळगा. टीकेचा सामना करावा करावा लागू शकतो. हे वाचा-खरंच! एखाद्या दिवशी Google अचानक बंद झालं तर काय होईल? तुळ- दीर्घ आजाराकडे काळाडोळा करू नका. तातडीनं त्यावर उपचार करायला हवेत. आर्थिक समस्या सोडवल्या जातील मात्र नवीन संकट उभं राहणार नाही याची देखील काळजी घ्या. वृश्चिक- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्या. आज आपण पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल. धनु- दीर्घकालीन दृष्टीकोनातून समभाग आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. समस्यांचा सामना करण्याची आपली क्षमता आपल्याला विशेष ओळख देईल. मकर - मद्यपान आणि व्यसनापासून दूर राहा. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील योजना गुप्त ठेवा. आज आपला मूड खराब असू शकतो. कुंभ- आज गुंतवणूक करू नका त्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते. प्रेमासाठी आपला दिवस आज खास असेल. मीन- आज कामावर लक्ष केंद्रीत करा आणि कामात अडथळे येणार नाहीत याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचं आश्वासन देऊ नका.
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या