राशीभविष्य : मिथुन आणि धनु राशीच्या व्यक्तींना मिळणार मोठा दिलासा

राशीभविष्य : मिथुन आणि धनु राशीच्या व्यक्तींना मिळणार मोठा दिलासा

प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : प्रत्येक दिवस चांगल्या-वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घेऊन येत असतो. येणाऱ्या समस्या आणि आव्हानांची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं जातं. त्यासाठी जाणून घ्या कसं असेल 13 जानेवारीचं 12 राशींचं राशीभविष्य.

मेष- आज आपल्या आजारावर चर्चा होऊ शकते. आज आपल्याला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

वृषभ- एकटेपणाची भावना खूप जास्त वाईट आहे. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कामासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल.

मिथुन- आज आपल्या समस्यांवर आपण मात करू शकाल. कर आणि विमा योजनांकडे आज अधिक बारकाईनं लक्ष द्या. आज आपल्या प्रिय व्यक्तीची खूप आठवण येईल.

कर्क- ध्यान आणि योग केल्यानं आपल्या शरीराला खूप मोठा फायदा मिळणार आहे. आज आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. मतभेदाचा सामना करावा लागू शकतो.

सिंह- समस्यांचा सामना करण्यासाठी मित्रांची मदत घ्या. भुतकाळ विसरण्याचा प्रयत्न करा.

कन्या- द्वेषाची भावना खूप वाईट आहे. आपण रागवल्यानं आज आपला दिवस खराब जाऊ शकतो. अनपेक्षित खर्च होतील, समस्यांचा सामना करावा लागेल.

हे वाचा-बर्ड फ्लूला घाबरू नका, फक्त ही काळजी तेवढी घ्या, पशुसंवर्धन विभाग काय म्हणतो पहा

तुळ- आज आपल्याला पटकन राग येऊ शकतो. ही भावना खूप जास्त नुकसानकारक आहे. रागाचा भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या दिवस फायदेशीर आहे.

वृश्चिक- आत्मविश्वास वाढवण्यावर भर द्या. जोडीदारासोबत आजचा दिवस खूप चांगला जाईल. घाईत गुंतवणूक करू नका.

धनु- आज आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पैसे खर्च करण्यावर जास्त भर देऊ नका.

मकर - ऑफिसमध्ये काम आवरतं घ्या. नवे करार फायदेशीर वाटत असले तरी त्यातून काही मिळेलच असे नाही. घाईगडबड करून कोणताही निर्णय घेऊ नका.

कुंभ- गर्भवती महिलांना आज अति काळजी घेणं आवश्यक आहे. वाढते खर्च अडचणीचे ठरणार आहेत.

मीन- जास्त कामाचा ताण आल्यानं आज आपलं शरीर थकण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसोबत आजचा दिवस चांगला जाणार नाही. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.

Published by: Kranti Kanetkar
First published: January 13, 2021, 7:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading