राशीभविष्य : कर्क आणि कन्या राशीच्या व्यक्तींना प्रवासात विशेष काळजी घ्या

राशीभविष्य : कर्क आणि कन्या राशीच्या व्यक्तींना प्रवासात विशेष काळजी घ्या

मेष ते मीन 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीसाठी असेल शुभ जाणून घ्या.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : येणारा रोजचा दिवस हा प्रत्येकवेळी सारखा नसतो. कधी आनंद घेऊन येतो तर कधी संकटं आणि समस्यांचा डोंगर. येणाऱ्या समस्यांची चाहूल लागली तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं असतं त्यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस.

मेष- आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ- आज ताणतणाव आल्यामुळे आपण उदास असाल. गरजेनुसार योग्य वेळी योग्य सल्ला घेणं आवश्यक आहे. एकाग्रतेनं काम केल्यास आजचा दिवस उत्तम आहे.

मिथुन- दातदुखणे, पोट दुखणं यासारख्या समस्या आपल्याला अस्वस्थ करू शकतात. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. सुट्टीच्या दिवशी देखील आपल्याला काम करावे लागू शकते.

कर्क- प्रवास तुम्हाला थकवा आणि तणाव देईल, परंतु आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील. घरातील कामे हाताळण्यात मुले तुमची मदत करतील.

सिंह- गैरसमजातून आज अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आज लोभ सुटला तरी स्वत:वर नियंत्रण ठेवायला हवं.

कन्या- गाडी चालवताना विशेष काळजी घ्या. प्रिय व्यक्तीसोबत अचानक झालेल्या रोमँटिक भेटीमुळे आपला दिवस चांगला होईल.

हे वाचा-Baby Jesus ला मास्क, Bubbles मध्ये Santa Claus; कोरोना काळातील Christmas

तुळ- आज आपण विचित्र वागाल त्यामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवा. आपल्याला ऑफिसमध्ये काही कंटाळवाणे काम करावे लागेल. आजचा प्रवास प्रवास, करमणूक आणि लोकांना भेटण्यासाठी असेल.

वृश्चिक- दीर्घ आजारापासून आपल्याला सुटका मिळेल. एकटेपणा दूर करण्यासाठी छंद जोपासा अथवा काशातरी मन गुंतवा.

धनु- आजूबाजूच्या लोकांच्या वागण्याचा आपल्याला त्रास होईल. आजची संध्याकाळ खूप चांगली जाईल.

मकर - खर्चावर वेळीच नियंत्रण राखा. कोणत्याही प्रकारचे आश्वासन देण्यापूर्वी आपल्या कामावर त्याचा परिणाम होणार नाही याची खात्री करुन घ्या.

कुंभ- आपण जो निर्णय घ्याल त्यावर खंबीर राहा. पैशांचं योग्य नियोजन करा.

मीन- कोणत्याही वादात अडकू नका. चांगल्या गोष्टींवर योग्य वेळ खर्च करा. वेळेचं नियोजन करा.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 12, 2020, 8:38 AM IST

ताज्या बातम्या