Elec-widget

PUBG चा नाद खुळा; या नादापायी हिने चक्क नवऱ्याला मागितला घटस्फोट

PUBG चा नाद खुळा; या नादापायी हिने चक्क नवऱ्याला मागितला घटस्फोट

बायको दिवस-रात्र पबजी खेळत असल्यामुळे नवरा करत होता तिला विरोध

  • Share this:

अहमदाबा, 22 मे : एखादी नादखुळी व्यक्ती केव्हा काय करेल हे अजिबात सांगता येत नाही. तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्का बसेल असा एक प्रकार गुजरातमधील अहमदाबाद येथे घडला आहे. पबजी खेळण्याचं व्यसन जडलेल्या एका 19 वर्षिय महिलेने तीच्या नवऱ्याला चक्क घटस्फोट मागितला आहे. घटस्फोट मागताना ''मला फक्त पबजी खेळायचं आहे'', असं कारण तिने सांगितलं आहे.

भारतात ऑनलाइन पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एका बाजूला या खेळाचं व्यसन जडलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात पोहोचली आहे, तर दुसरीकडे अशा नादखुळ्या व्यक्तिंमुळे सर्वसामान्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे.

गर्लफ्रेंडचा 2 वर्षापासून अबोला; नाकाचा चावा घेत ब्रॉयफ्रेंडनं काढला पळ

अहमदाबादमधली ही घटना तेव्हा समोर आली, जेव्हा या महिलेने घटस्फोटासाठी 181 या हेल्पलाइनवर मदत मागितली. या महिलेला आपल्या परिवारापासून आणि आई-वडिलांपासून दूर वसतीगृहात रहायचं आहे. जिथे आरामात बसून तिला मित्रांसोबत ऑनलाइन पबजी खेळायचं आहे.

"181 वर फोन करणाऱ्या या महिलेचं तिच्या नवऱ्यासोबत अजिबात पटत नाही. आई-वडिलांनी तिचा फोन हिसकून घेतला होता, त्यामुळे ती त्यांच्या घरीसुद्धा जायला तयार नाही'', असं हेल्पलाइनच्या कॉर्डिनेट रफाल्गुनी पटेल सांगतात. वसतीगृहात फोन वापरता येत नाही, तसंच बाहेरसुद्धा जाता येत नाही असं सांगितल्यानंतर तिने आपला विचार बदलला आणि तिने आपल्या गेमिंग पार्टनरकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली, असं फाल्गुनी पटेल सांगतात.

Loading...


‘लग्न करायचं असल्यास हिंदू धर्म स्वीकार, मांसाहार सोडून दे’


दिवस-रात्र पबजी खेळत असल्यामुळे या महिलेचा नवरा तिला विरोध करत होता. याच कारणावरून त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं आणि ती तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली. तीचा हा नाद त्यांनासुद्धा पटला नाही. त्यामुळे त्यांनी तिचा मोबाइल हिसकून घेतला.

लग्नाला 10 वर्ष झालेल्या आणि एका मुलाची आई असलेल्या या महिलेला असा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी थोडा विचार कर असा सल्ला आम्ही दिला असल्याचं फाल्गुनी पटेल म्हणाल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: PUBG
First Published: May 22, 2019 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...