हाँगकाँग, 01 डिसेंबर : आपल्यापैकी प्रत्येकाचं इन्स्टाग्राम आहे. ज्यावर आपण हौशेनं आपले फोटो शेअर करतो. स्टार्स, मॉडेल्स यांचं तर इन्स्टाग्राम अकाऊंट असतंच आणि त्यांचे कित्येक फॉलोअर्सही असतात. सामान्यपणे या फोटोंवर कमेंट्स येतात. कुणाच्या चांगल्या तर कुणाच्या वाईट प्रतिक्रिया असतात. फोटोंवरून ट्रोल केलं जातं मात्र ही मॉडेल उद्ध्वस्त झाली आहे.
हाँगकाँगमधील 25 वर्षांची सो मीयाननं (So Mei-yan) आपल्या इन्स्टाग्रामवर डिझायनर कपड्यांसह फोटो शेअर केला. मॉडेलचे इन्स्टाग्रामवर 80 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या फोटोत तिच्यासह तिचा सहा महिन्यांचं मूलही होतं. शिवाय तिच्या हातात पैसे होते. हा फोटो पाहताच तिच्या घरात तीन व्यक्ती आल्या आणि त्यांनी तिच्या घरात लूट केली आहे.
फोटो पाहताच तिच्या अपार्टमेंटमध्ये तीन व्यक्ती घुसल्या. त्यांच्या हातात चाकू होता. त्यांनी महिलेला आधी टेपच्या मदतीनं खुर्चीला बांधलं. त्यानंतर तिच्या घरातील सर्व सामानाची लूट केली. सकाळी अकराच्या सुमारासच ही घटना घडली आहे.
हे वाचा - तोंडात बोळा कोंबून लाटण्याने पतीचा घेतला जीव; दिराला फोन करुन म्हणाली, 'आता या..
मॉडेलनं सांगितलं ती आपल्या रूममध्ये झोपली होती. तेव्हा तिला लिव्हिंग रूममध्ये अचानाक आवाज आली. तेव्हा ती आपल्या बेडरूममधून बाहेर पाहिली तेव्हा आपल्या घरात तीन लोक घुसल्याचं तिला दिसलं. या सर्वांनी टोपी आणि सर्जिकल मास्क घातले होते. त्यांच्या हातात चाकू आणि रॉड होता. आधी त्यांनी दरवाजाची बेल वाजवली आणि घरातील मोलकरणीनं दरवाजा खोलला. तिघंही दरवाजातूनच आत आले.
मॉडेल म्हणाली, त्यांना जे काही हवं होतं ते मी दिलं होतं. मात्र तरीदेखील त्यांनी हेल्पर, मला आणि माझ्या मुलाला मारहाण केली. त्या तिघांनी मला, माझ्या मुलाला आणि आयाला टेपनं बांधलं. घरातील डिझायनर सामान चोरलं. एकानं तर मुलाला जोरात आवळलं आणि दुसऱ्यानं माझे केस खेचत पैशांबाबत विचारणा केली. चोर चायनीज होते. जवळपास 40 ते 50 वर्षांचे होते ते. सूटकेसमध्ये त्यांनी सामान भरलं आणि फरार झाले.
हे वाचा - ST बसची वाट पाहत उभा असलेल्या प्रवाशाच्या हातातून मोबाईलची चोरी
तिच्या घरातून 4,00,000 हजार डॉलर्स म्हणजेजवळपास 2,94,35,000 रुपयांचं सामान लुटून लुटारू पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लुटारूंनी 10 हँडबँग, 7 घड्याळ, एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल यांचा समावेश आहे. एक दिवसापूर्वीदेखील चोरट्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता, असं पोलिसांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Instagram, Photo