Home /News /lifestyle /

Instagram वर फोटो शेअर करणं मॉडेलला पडलं महाग; दरोडेखोरांनी केली भयंकर अवस्था

Instagram वर फोटो शेअर करणं मॉडेलला पडलं महाग; दरोडेखोरांनी केली भयंकर अवस्था

हाँगकाँगच्या सो मियान ( So Mei-yan) या मॉडेलने डिझायर कपडे घालून हातामध्ये पैसै घेऊन एक फोटो instagram वर शेअर केला. त्यानंतर...

    हाँगकाँग 2 डिसेंबर : सोशल मीडिया (Social Media) वर फोटो शेअर करणे अनेकांना आवडतं. आपण शेअर केलेल्या फोटोवर प्रतिक्रिया आणि लाईक्सचा पाऊस पडावा असं सोशल मीडिया यूझर्सना वाटत असतं. हाँगकाँगमधल्या एका मॉडेलला मात्र ही हौस चांगलीच महाग पडलीय. हाँगकाँगमधील सो मियान ( So Mei-yan)  या 25 वर्षांच्या तरुणीने डिझायनर कपड्यांमध्ये एक फोटो इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर केला. त्या फोटोत तिचा सहा महिन्यांचा मुलगाही होता. त्याचबरोबर तिच्या हातात भरपूर पैसे देखील होते. सो मियानने मोठ्या हौसेने इंस्टाग्रामवर शेअर केलेला तो फोटोच तिच्या जीवावर बेतला! फोटो पाहून घरात शिरले चोर! सो मियानचा भरपूर पैसे हातात असलेला फोटो पाहून तीन चोर तिच्या घरात शस्त्रासह शिरले. त्यांनी तिला खुर्चीला बांधलं आणि घरातील सर्व साहित्य घेऊन ते पसार झाले. ‘या चोरांनी घरातील 10 हँडबॅग, 7 घड्याळं, एक लॅपटॉप आणि दोन मोबाईलची चोरी केली’ अशी माहिती पोलिसांनी दिलीय. घरातील जवळपास 2, 94, 35,000 रुपये किमतीच्या सामानाची चोरी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. “मी आतल्या खोलीत झोपलेली असताना बाहेरच्या खोली चोर शिरले. मला आवाज आल्यानंतर मी बाहेर पाहिले त्यावेळी टोपी आणि सर्जिकल मास्क घातलेले चोर तिथे उपस्थित होते. त्यांच्या हातामध्ये फळं कापण्यासाठी वापरतात तो चाकू आणि रॉड होता’ असा अनुभव त्या महिलेने सांगितला. मॉडेलचे इंस्टाग्रामवर 80 हजार फॉलोअर्स इंस्टाग्रामवर 80 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या सो मियानने पुढे सांगितले की, “ त्या चोरांनी मला, माझ्या बाळाला आणि बाळाचा सांभाळ करणाऱ्या नॅनीला टेपने बांधले. ते चोर चायनीज वाटत होते. तसेच त्यांचे वय 40 ते 50 दरम्यान होतं. एका चोराने बाळाचे डोके जोराने दाबले. दुसऱ्याने माझे केस ओढले आणि मला घरातील किंमती वस्तू कुठे आहेत हे विचारले. त्यानंतर त्यांनी घरातील अनेक डिझायनर्स वस्तूंची चोरी केली. चोरीचे सर्व सामान सुटकेसमध्ये भरुन ते पसार झाले. दरम्यान, या चोरांनी एक दिवसापूर्वी देखील घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलिसांनी सांगितले. Exrept –  हाँगकाँगच्या सो मियान ( So Mei-yan) या मॉडेलने डिझायर कपड्यात हातामध्ये पैसै घेऊन एक फोट इस्टांग्रामवर शेअर केला. त्यानंतर तीन चोर तिच्या घरात घुसले. त्यांनी त्या महिला मॉडेल आणि तिच्या सहा महिन्याच्या बाळाला मारहाण केली आणि ते कोट्यवधी रुपयांचे साहित्य घेऊन पसार झाले.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Instagram

    पुढील बातम्या