Homeopathy औषधं घेताय; तुम्ही अशी चूक तर करत नाहीत ना?

Homeopathy औषधं घेताय; तुम्ही अशी चूक तर करत नाहीत ना?

होमिओपॅथी (homeopathy) औषधं घेत असला तर ही माहिती जरूर वाचा.

  • Last Updated: Oct 16, 2020 03:21 PM IST
  • Share this:

होमिओपॅथिक उपचार हे कोणत्याही प्रकारच्या समस्येवर उपचार करण्यासाठी बरेच प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. होमिओपॅथीमध्ये कोणत्याही शारीरिक समस्येचा मुळापासून उपचार केला जातो जेणेकरून शारीरिक समस्या किंवा रोग पुन्हा उद्भवणार नाही. होमिओपॅथीच्या उपचारांचा परिणाम हळू हळू होतो, मात्र त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

मात्र होमिओपॅथी उपचार घेताना काही विशेष काळजी घेण्याची गरज असते. ही खबरदारी कोणती पाहुयात.

औषधं काळजीपूर्वक ठेवा

होमिओपॅथिक औषधं लहान पांढर्‍या गोळ्यांच्या रुपात तसंच ते द्रव स्वरूपात देखील उपलब्ध आहे. या औषधांची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. औषधं सामान्य तापमानात ठेवली पाहिजेत, म्हणजेच त्यांना अगदी थंड तापमानात किंवा अति तापमानातही ठेवू नका. नाहीतर औषधांचा प्रभाव होणार नाही. सर्व होमिओपॅथिक औषधं लहान मुलांपासून दूर ठेवावीत.

औषधाच्या सेवनाचे नियम लक्षात ठेवा

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, होमिओपॅथिक औषध वापरताना डॉक्टरांनी कोणत्या प्रकारचे नियम पाळण्यास सांगितले आहे याबद्दल विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यातील कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न दिल्यास औषधाचा परिणाम होणार नाही. डॉक्टरांनी कोणत्या वेळी आपल्याला कोणते औषध घेण्यास सांगितलं आहे हे नेहमी लक्षात ठेवा. वेळेवर घेतलेलं औषध प्रभावी ठरेल. या व्यतिरिक्त औषध कसं घ्यावं, कशासोबत घ्यावं याची माहितीही डॉक्टर देतात. होमिओपॅथीच्या औषधाचा वापर करण्यासाठी डॉक्टर कागदाची पुडी बनवतात आणि मग ते औषध केवळ कागदाच्या माध्यमातूनच घेण्यास सांगतात. या औषधांना स्पर्श करण्यास मनाई असते.

होमिओपॅथीक उपचारादरम्यान पथ्यं

बहुतेक होमिओपॅथिक औषधाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टर काही विशेष पदार्थ टाळण्याचा सल्ला देतात. त्याबद्दल विशेष काळजी घ्या नाहीतर औषधाचा परिणाम  होणार नाही. औषध आपल्याला ज्या वेळी घ्यायला सांगितलं आहे ते त्याच वेळी घेणं आवश्यक आहे. निर्धारित वेळ मर्यादेपर्यंत औषध घेऊन त्या औषधाचं चक्र पूर्ण होतं. होमिओपॅथिक औषधांचा वापर करताना धूम्रपान करणं टाळलं पाहिजे. यावेळी लसणीचंही सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - होमिओपॅथी औषध

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 16, 2020, 3:21 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या