मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Homeopathy उपचारांनी करा डेंग्यूवर मात; प्रभावी ठरणारी होमिओपॅथी औषधं

Homeopathy उपचारांनी करा डेंग्यूवर मात; प्रभावी ठरणारी होमिओपॅथी औषधं

 होमिओपॅथिक (Homeopathy) उपचार डेंग्यूवर (dengue) खूप प्रभावी आहेत. होमिओपॅथिक औषधांचा रुग्णावर दुष्परिणाम देखील होत नाही.

होमिओपॅथिक (Homeopathy) उपचार डेंग्यूवर (dengue) खूप प्रभावी आहेत. होमिओपॅथिक औषधांचा रुग्णावर दुष्परिणाम देखील होत नाही.

होमिओपॅथिक (Homeopathy) उपचार डेंग्यूवर (dengue) खूप प्रभावी आहेत. होमिओपॅथिक औषधांचा रुग्णावर दुष्परिणाम देखील होत नाही.

  • myupchar
  • Last Updated :
    डेंग्यू (dengue) डास चावल्याने होणारा एक धोकादायक आजार आहे. डेंग्यूमध्ये रुग्णाला जास्त ताप, डोकेदुखी, डोळ्यांचा त्रास, उलट्या होणं आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव अशी लक्षणं आढळतात. डेंग्यू हा एक धोकादायक विषाणू आहे ज्यामध्ये रुग्णाच्या पांढर्‍या रक्त पेशींची संख्या खूप कमी होऊ लागते. होमिओपॅथिक (Homeopathy) उपचार या रोगामध्ये खूप प्रभावी आहेत. होमिओपॅथीक औषधांचा रुग्णावर दुष्परिणाम देखील होत नाही. तसंच ही औषधं रोगाला मुळापासून दूर करतात. चला या होमिओपॅथिक औषधांबद्दल जाणून घेऊया. ब्रायोनिया ब्रायोनिया होमिओपॅथिक औषध वाइल्ड हॉप्स म्हणून देखील ओळखलं जातं. डेंग्यूच्या रुग्णात चिडचिडेपणा, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमध्ेय टोचल्यासारखं वाटणं, तोंड येणं आणि स्नायू दुखणं अशी लक्षणंआढळल्यास हे औषध त्यांच्यासाठी खूप प्रभावी आहे. कल्केरिया कार्बोनिका कल्केरिया कार्बोनिका हे औषध डेंग्यूच्या रुग्णाला जेव्हा फोड किंवा लहानसहान पुरळ येतात तेव्हा दिली जातात. याशिवाय तीव्र थंडी वाजून येणं, टॉन्सिल्समध्ये सूज येणं, छातीत जडपणा जाणवणं तसंच दुपारनंतर मानसिक थकवा जाणवणं यासारख्या लक्षणांवर देखील हे प्रभावी औषध म्हणून कार्य करते. बेलाडोना बेलाडोनाचं जेनेरिक नाव डेडली नाइटशेट आहे. पोटात मुरगळ आणि श्वास घेण्यास अडचण, मान आखडणं अशी कोणतीही लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी हे औषध अतिशय फायदेशीर मानलं जातं. युपोरिटियम परफॉली हे होमिओपॅथिक औषध त्या डेंग्यू रूग्णांना देण्यात येतं ज्यांना डोळ्यांमध्ये वेदना होत आहेत, फरशीवर पडल्यावर डोकेदुखी होते, हलके डोळे दुखतात, रात्री जास्त खोकला येतो किंवा संध्याकाळी सर्दी होते, शरीर दुखतं. तसंच हाडांमध्ये वेदनेसारखी लक्षणं आढळतात. या औषधाच्या वापरामुळे रुग्णाला आराम मिळतो. नक्स वोमिका ज्या रुग्णांना चिडचिडेपणाचा त्रास आहे, घशात घट्टपणा आणि सर्दी आहे. त्याशिवाय खोकला, डोकेदुखी, हिरड्यांना सूज येणं या सर्व लक्षणांसाठी हे एक प्रभावी औषध आहे. डेंग्यूच्या रुग्णांनी त्यांचा दिनक्रम देखील बदलला पाहिजे आजार कोणताही असो होमिओपॅथीमध्ये डॉक्टर नित्यक्रम बदलण्याचा सल्ला देतातच. होमिओपॅथिक औषधांचा शरीरावर परिणाम व्हावा म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करणं आवश्यक आहे. डेंग्यूच्या रुग्णाच्या सभोवतालचं वातावरण स्वच्छ असलं पाहिजे. यावेळी रुग्णानं भरपूर तंतुमय पदार्थ खावेत आणि पौष्टिक आहार घ्यावा. डेंग्यूचा रुग्ण बरा झाल्यावर रुग्ण पूर्णपणे निरोगी होत नाही म्हणूनच त्यांनी सामान्य प्राणायाम आणि नियमित व्यायाम करणं चालू ठेवणं महत्त्वाचं आहे. यामुळे हा रोग उलटण्याची शक्यता कमी होते. यामुळे लवकरच रुग्णाचा अशक्तपणाही कमी होतो. इतकंच नाही तर प्रथिनयुक्त आहाराचं अधिक सेवन केले पाहिजे. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - डेंग्यू: लक्षणे, कारणे, उपचार, औषध... न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या