टेन्शन सोडा! होमिओपॅथिक उपायांनी कमी करा लठ्ठपणा

टेन्शन सोडा! होमिओपॅथिक उपायांनी कमी करा लठ्ठपणा

लठ्ठपणा (obesity) दूर करण्यासाठी व्यायाम (excercise) नक्कीच एक चांगला पर्याय आहे. मात्र होमिओपॅथिक (homeopathy) औषधांचा वापर यात अधिक मदत करू शकतात

  • Last Updated: Dec 1, 2020 08:34 AM IST
  • Share this:

लठ्ठपणा (obesity) ही सध्याची सर्वात मोठी शारीरिक समस्या आहे. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार हे  याचं एक मोठं कारण आहे. myupchar.comशी संबंधित एम्सचे डॉ. अनुराग शाही यांनी सांगितलं, लोक दररोज नकळत दिवसभर बरेच कर्बोदकयुक्त पदार्थ खातात, त्या तुलनेत शरीरातील फारच कमी प्रमाणात कर्बोदकं कमी होतात. त्यामुळे वजन वाढणं स्वाभाविक आहे. शरीरातील ऊर्जेसाठी काही कर्बोदकं आवश्यक असले तरी शरीरातील अतिरिक्त कर्बोदकं चरबी म्हणून जमा होण्यास सुरवात करतात आणि त्यामुळेच लठ्ठपणा होतो.

लठ्ठपणा दूर करण्यासाठी व्यायाम नक्कीच एक चांगला पर्याय आहे. मात्र होमिओपॅथिक औषधांचा वापर यात आणखी अधिक मदत करू शकतात. होमिओपॅथिक औषधं शरीराच्या पचनप्रक्रियेमध्ये सुधारणा करून चरबी जलद वितळवण्याचं कार्य करतात.  अशाप्रकारे व्यायाम आणि संतुलित आहार घेत वजन कमी करता येऊ शकतं.

नेट्रममूर

मांडी आणि पृष्ठभागाचं वजन कमी करण्यास या औषधाचा वापर उपयुक्त आहे. व्यायामासोबतच या औषधाचं सेवन केल्यास चरबी लवकरच कमी होते. स्नायू देखील लवचिक होतात.

फिटोलेकाबेरी

पोटातील चरबी किंवा शरीराच्या कोणत्याही भागातील अत्याधिक चरबी कमी करण्यासाठी हे औषध खूप प्रभावी आहे. याशिवाय हे औषध शरीराला चरबी वाढण्यापासून प्रतिबंधित करतं. हे दररोज सकाळी रिकाम्या पोटावर 10 थेंब घेतलं जाऊ शकतं.अन्न घेतल्यानंतर आपण हे औषध कोमट पाण्यातून दररोज तीन वेळा घेऊ शकता, याचा फायदा होईल.

कॅल्केराकार्बनिका

कॅल्केरिया कार्बनिका एक होमिओपॅथिक औषध आहे. या औषधाचं सेवन चरबी कमी करण्यास मदत करतं. हे विशेषत: पोटाचा घेरा म्हणजेच पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

फ्युकस वेसिक्युलोसिस

फ्युकस वेसिक्युलोसिस लठ्ठपणासाठी एक अतिशय प्रभावी औषध आहे. हे लठ्ठपणानंतर उद्भवणार्‍या सर्व लक्षणांविरोधी उपयुक्त आहे. जसं अपचन आणि पोटाचा गॅस, सतत बद्धकोष्ठतेची समस्या, थायरॉईड वाढणं, डोकेदुखी इ.

कॅल्केरिया आर्सेनिकोसो

हे लठ्ठपणाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यास उपयुक्त आहे. लठ्ठपणानंतर बर्‍याच समस्या उद्भवू लागतात. जसं की बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोटाशी संबंधित इतर समस्या. या व्यतिरिक्त हे औषध स्त्रियांमधील रजोनिवृत्तीसाठीदेखील फायदेशीर आहे.

कॅप्सिकमएनम

हे औषध कायेन पेपर म्हणून देखील ओळखलं जातं. ज्यांचे स्नायू सैल आणि कमकुवत आहेत त्यांच्यासाठी हे औषध फायदेशीर आहे. याशिवाय अशक्तपणासाठीही फायदेशीर आहे.

myupchar.comशी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी  होमिओपॅथिक औषधं खूप प्रभावी आहेत, पण जर तुम्हाला त्वरित परिणाम हवा असेल तर नियमित व्यायामदेखील करावा. यामुळे वजन कमी करण्यात दुप्पट फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी ह्रदयाचा व्यायाम करणं अधिक फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला दररोज सायकल चालवणं, दोरीउड्या मारणं, पोहणं, वेगवान चालणं किंवा दररोज किमान 40 मिनिटं धावण्याचा सराव केला पाहिजे, यानं फायदा होऊ शकतो.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – लठ्ठपणा (स्थूलता): लक्षणे, कारणे ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीयमाहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेतस्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठीआरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 1, 2020, 8:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading