मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गरब्याला जाण्यापूर्वी करा हा उपाय; काही मिनिटांत चेहऱ्यावर येईल चमक

गरब्याला जाण्यापूर्वी करा हा उपाय; काही मिनिटांत चेहऱ्यावर येईल चमक

त्वचेची काळजी घेण्यासाठी टोमॅटोचा वापर सामान्य आहे, परंतु तुम्ही कधी त्वचेवर टोमॅटो फेशियल केले आहे का? चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी टोमॅटो फेशियलचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो.

त्वचेची काळजी घेण्यासाठी टोमॅटोचा वापर सामान्य आहे, परंतु तुम्ही कधी त्वचेवर टोमॅटो फेशियल केले आहे का? चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी टोमॅटो फेशियलचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो.

त्वचेची काळजी घेण्यासाठी टोमॅटोचा वापर सामान्य आहे, परंतु तुम्ही कधी त्वचेवर टोमॅटो फेशियल केले आहे का? चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी टोमॅटो फेशियलचा वापर खूप प्रभावी ठरू शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी अनेकांना फेशियल करायला आवडते. अशा परिस्थितीत, काही लोक फेशियलसाठी अपॉइंटमेंट घेऊन पार्लरमध्ये जातात, तर काही लोक नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने घरी फेशियल करतात. मात्र, तुम्ही या फेस्टिव्ह सीझनमध्ये घरीच टोमॅटो फेशियल करू शकता. होय, तुम्ही स्टेप बाय स्टेप टोमॅटो फेशियल करून तुमच्या चेहऱ्यावर अद्भुत चमक आणू शकता.

प्रत्येकाला पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणं शक्य होत नाही. व्हिटॅमिन सी समृद्ध टोमॅटो फेशियल चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. चला जाणून घेऊया टोमॅटो फेशियल करण्याच्या स्टेप्स, ज्याचे पालन करून तुम्ही चेहरा चमकदार आणि सुंदर बनवू शकता.

टोमॅटो फेशियलचे फायदे

टोमॅटोला व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जाते, ज्यामुळे टोमॅटो फेशियल केल्याने त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते. यासोबतच मुरुम, पिंपल्स, टॅनिंग, सनबर्न आणि सुरकुत्या यापासून मुक्ती मिळवून तुम्ही त्वचा चमकदार आणि डागरहित करू शकता. टोमॅटो फेशियल कसे करायचे ते जाणून घेऊया.

राहिले केवळ 3 दिवस; असा मेकअप केला तर गरब्यात तुमचीच होईल चर्चा, लगेच हा Video पाहा

टोमॅटो क्लिंजिंग

टोमॅटोने फेस क्लीनिंग करण्यासाठी 3-4 टोमॅटो बारीक करून प्युरी बनवा. आता 1 चमचे टोमॅटो प्युरीमध्ये 2 चमचे दूध मिसळून चेहऱ्याला मसाज करा आणि 10 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या त्वचेतील घाणीचे कण निघून जातील आणि त्वचा चमकू लागेल.

टोमॅटो स्क्रबिंग

टोमॅटोने स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासोबतच टॅनिंगपासूनही सुटका मिळते. यासाठी टोमॅटो अर्धा कापून घ्या. आता चिरलेल्या टोमॅटोवर मैदा किंवा पिठीसाखर टाकून चेहऱ्यावर 5 मिनिटे चोळा आणि अशाप्रकारे संपूर्ण चाऱ्याला टोमॅटोची स्क्रब करा. त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

टोमॅटो फेस पॅक

टोमॅटोचा फेस पॅक तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवून ग्लो राखण्यासाठी उपयुक्त ठरेल. ते बनवण्यासाठी 2 चमचे टोमॅटो प्युरीमध्ये १ चमचे बेसन, 2 चमचे दही, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 1 चिमूट हळद मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

National Mud Pack Day : तेलकट आणि निस्तेज त्वचेपासून मिळेल सुटका, अशा पद्धतीने वापरा मड फेस पॅक

चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा

टोमॅटो फेशियल केल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करायला विसरू नका. अशा परिस्थितीत त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी चांगले मॉइश्चरायझर किंवा लोशन वापरा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून अलोव्हेरा जेलदेखील वापरू शकता.

First published:

Tags: Beauty tips, Health, Health Tips, Lifestyle