मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair Mask : तुमचेही केस पातळ होत आहेत का? हे दोन घरगुती हेअर मास्क ठरतील फायदेशीर

Hair Mask : तुमचेही केस पातळ होत आहेत का? हे दोन घरगुती हेअर मास्क ठरतील फायदेशीर

Homemade Hair Thicker Mask : प्रदूषण, तणाव आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींचा केसांवर झपाट्याने परिणाम होतो. त्यामुळे केस कमकुवत आणि पातळ होतात आणि गळू लागतात. काही घरगुती हेअर मास्कच्या मदतीने आपण केस निरोगी आणि घनदाट बनवू शकता.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : आजकाल अनेकजण केस पातळ होण्याच्या समस्येशी झुंजत आहे. केस पातळ झाल्यानं स्टाईल वैगेर करणं तर दूरच केस डोक्यावर राहतील की नाही याची काळजी वाटू लागते. अशा स्थितीत बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर मास्कपेक्षा घरगुती हेअर मास्क वापरल्यास केस निरोगी, मजबूत आणि घनदाट होतील. पातळ केस घनदाट करण्यासाठी तुम्ही घरी कधीही देसी हेअर मास्क वापरू शकता. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्यास दोन ते चार आठवड्यात केसांमध्ये फरक दिसू लागेल. चला तर मग जाणून घेऊया घरी (Homemade Hair Thicker Mask) कसा बनवायचा घरगुती हेअर मास्क.

केस दाट करण्यासाठी हेअर मास्क

1.नारळाचे दूध आणि मेथीचे दाणे

पातळ आणि कमकुवत केस निरोगी आणि घनदाट होण्यासाठी नारळाचे दूध आणि मेथीचे दाणे वापरा. हे दोन्ही केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. यामुळे केस लवकर मजबूत बनतात. जर तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा हा हेअर मास्क वापरलात तर दोन आठवड्यांत तुम्हाला तुमच्या केसांच्या आरोग्यात सुधारणा दिसू लागेल.

असे बनवा

तुमच्या केसांच्या लांबीनुसार मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. जर तुमचे केस लहान असतील तर दोन ते तीन चमचे मेथी दाणे पुरेसे आहेत आणि जर तुमचे केस मोठे असतील तर तुम्हाला अर्धी वाटी घ्यावी लागेल. आता मेथी दाणे सकाळी नारळाच्या दुधात बारीक करून घ्या. यासाठी तुम्ही किमान 4 ते 5 चमचे नारळाचे दूध घेऊ शकता. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. आता तयार केलेली पेस्ट हेअर मास्कप्रमाणे केसांच्या मुळापर्यंत लावा आणि अर्धा तास तसंच राहू द्या. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.

हे वाचा - Good News! मोदी सरकारच्या या निर्णयामुळे खाद्यतेल होणार स्वस्त, बेसिक ड्यूटी 2.5 टक्क्यांवरुन शुन्यावर

2.एग हेअर मास्क

केसांना अंडे लावल्यास केस लांब आणि घनदाट होतात. यासाठी तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अर्धा तास केसांवर अंड्याचा हेअर मास्क लावावा लागेल. हा मास्क तयार करण्यासाठी, तुम्ही एक अंडे घ्या आणि नंतर त्याचे पांढरे आणि पिवळे भाग चांगले फेटा. आता या द्रवामध्ये दोन चमचे खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल घाला. नंतर केसांच्या मुळांवर लावा.

हे वाचा - Google Update: 9 नोव्हेंबरपासून बदलणार लॉगइनची पद्धत; यूझर्सच्या सुरक्षेसाठी गुगलनं उचललं मोठं पाऊल

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Woman hair