Home Remedies : सर्दी-खोकला आणि साथीचे रोग दूर ठेवण्यासाठी या 6 गोष्टी घरात ठेवाच

पावसाळ्यात सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप हे आजार नेहमीचेच आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे हे त्रास होतात. त्यापासून दूर राहायचं असे किंवा आजारावर लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर हे घरगुती उपाय करून पाहा...

  • Share this:

खडीसाखर : खडीसाखरेत अनेक औषधी गुणधर्म आहेत. खोकला किंवा ढास असेल तर खडीसाखर चघळावी, लवकर आराम मिळतो. सारखी उचकी लागत असेल तरी उचकी थांबवण्याचा हा रामबाण उपाय आहे.

मध : कफ, सर्दी, खोकला यावर आयुर्वेदात सांगितलेला हा चांगला उपाय आहे. कोमट पाण्याबरोबर मध घेतल्यास फायदा होईल. सकाळी उठून लिंबू- मध-पाणी घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढते.

लिंबू : लिंबात व्हिटॅमिन C असतं. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि जंतूंचा प्रतिकार करण्यासाठी लिंबू आवश्यक. नियमितपणे थोडंतरी लिंबू आहारात असायलाच हवं. लिंबू-मध-पाणी-आलं हे पाचक पावसाळ्यात घेणं हितकारक.

पुदिना : पुदिन्यात अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळेही रोगप्रतिकारशक्ती वाढते. पुदिना, लिंबू एकत्र करून घ्यावं. तसंच सर्दी झाली असेल तर गवती चहा, आलं, दालचिनी, लवंग, जवस यांचा काढा करून त्यात पुदिन्याची पानं पण उकळावीत. हा सर्दी- कफ हटवण्याचा जालीम उपाय आहे.

ज्येष्ठमध : ज्येष्ठमधाच्या काड्यांचा काढा करून घेतलं, तर कफापासून लवकर मुक्तता मिळते. घसा खवखवणे, दुखणे, खोकला, कफ, ताप यावर उपाय म्हणून ज्येष्ठमध आणि मध यांचं चाटण थोड्या थोड्या वेळाने घेत जावं.

जवस : याला अळशी असंही म्हणतात. दोन चमचा जवस पाण्यात उकळून त्यात खडीसाखर आणि लवंगही उकळावी. हा काढा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. यामुळे कफ पातळ होतो आणि लवकर आराम मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 08:00 AM IST

ताज्या बातम्या