मुंबई, 1 डिसेंबर : स्त्री कोणतीही असो तिला लांब केस आवडतातच. परंतु आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे सर्वांकडेच केसांची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अनेक स्त्रियांना केसांच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी अनेक स्त्रिया केसांवर महागड्या उत्पादनांचा वापर करतात. परंतु हे केमिकलयुक्त उत्पादने तुमच्या केसांना हानी पोहचवू शकतात. तुम्ही केसांच्या समस्यांचा सामना करत असाल आणि तुम्हाला देखील सुंदर आणि मजबूत केस हवे असतील तर आता टेंशन सोडा. घरबसल्या काही सोपे उपाय करून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता. त्यासाठी आम्ही येथे काही उपाय सुचवत आहोत.
केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही केस कोणत्या पाण्याने धुता हे खूप महत्वाचे आहे. तुम्ही केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरत असाल तर त्यामुळे तुमचे केस रुक्ष आणि कमकुवत होऊ शकतात. याशिवाय हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुतल्याने त्यात कोंडा होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला येथे केस धुण्याच्या काही टिप्स देत आहोत.
Hair Care : फक्त त्वचाच नव्हे तर केसांसाठीही फायदेशीर आहे बेसन; असा करा वापर
अलसीच्या पाण्याने धुवा केस
हरजिंदगी डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, असलीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-बी आणि प्रोटिन्स असतात. त्यामुळे केसांसाठी नैसर्गिक उपाय म्हणून त्याचा वापर केला जातो.अलसीच्या पाण्याने केस धुतल्याने केस मजूबत होतात. अलसी अँटीफंगल असते, त्यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या संपते. यात असलेल्या प्रोटिन्समुळे केसांची वाढ होते. तसेच अकाली हे पाणी अकाली केस पांढरे होण्यापासून रोखते. हे पाणी तयार करण्यासाठी 2 चमचे अलसी 2 ग्लास पाण्यात भिजवून रात्रभर झाकून ठेवा. हे पाणी सकाळी गाळून घ्या. ते पाणी थोडे घट्ट होईल. या पाण्याने संपूर्ण केस भिजवा आणि थोडावेळ तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्या.
लिंबूच्या पाण्याने धुवा केस
आवड्यातून 2 ते 3 वेळा लिंबूच्या पाण्याने केस धुतल्यास केसांची मुळे मजबूत होतात आणि वाढू लागतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सीसोबतच आयर्नही आढळते. परंतु लिंबू कधीही थेट केसांमध्ये कधीही वापरू नका. लिंबाचा रस पाण्यात मिसळून केसांना लावल्यास त्याचा फायदा होतो. शॅम्पूने केस धुतल्यानंतर 1 कप पाण्यात 2 लिंबू पिळा आणि त्या पाण्याने केस धुवा. तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसतील. लिंबाच्या पाण्यामुळे तुमच्या केसांना एक वेगळीच चमक येईल. तुमचे केस पातळ असतील तर ते घट्ट दिसू लागतील. तसेच या पाण्याने केस धुतल्याने टाळूमध्ये कोंड्याची समस्या देखील दूर होते.
Winter Tips : केसगळतीची समस्या मुळापासून संपेल; आहारात सामील करा हे पदार्थ
तांदळाचं पाणी
तांदळाच्या पाण्यात अमीनो अॅसिड असते आणि त्यामुळे केस मजबूत होतात. या पाण्याने केस धुतल्यान केसांची वाढू लागतात. तुम्ही तांदळाचे पाणी दोन प्रकारे वापरू शकता. एक म्हणजे तांदूळ पाण्यात भिजवा आणि नंतर त्याचे पाणी वापरा किंवा तांदूळ शिजवून त्यातून निघणारा स्टार्च केसांना लावा. दोन्ही पद्धतीत तांदळाचे पाणी केसांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय तुम्ही आंबवलेल्या तांदळाचे पाणी देखील वापरू शकता. तांदळाचे पाणी केसांना लावल्याने केसांची वाढ चांगली होते आणि केस फाटत असतील तर तेही बरे होतात. तसेच केसांमध्ये चमक येते आणि ते मजबूत होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Health, Health Tips, Lifestyle, Woman hair