मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

White Hair : पांढऱ्या केसांवर हा घरगुती उपाय आहे जबरदस्त, गुळासोबत खा हा पदार्थ

White Hair : पांढऱ्या केसांवर हा घरगुती उपाय आहे जबरदस्त, गुळासोबत खा हा पदार्थ

White Hair problem: केस पांढरे होण्याची समस्या आजकाल तरुण मुलांसह शाळकरी विद्यार्थ्यांमध्येही दिसत आहे. अकाली केस पांढरे होत असल्याने अनेकजण यावर औषधोपचार घेत असतात. मात्र, काही घरगुती उपायांच्या मदतीनं आपण पांढऱ्या केसांवर इलाज करू शकतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : पूर्वी केस पांढरे (White Hair problem) होणं म्हणजे वृद्धत्वाचं एक लक्षण समजलं जायचं. पण आता अगदी कमी वयातही केस पांढरे होऊ लागले आहेत. तरुण-तरुणींचे केस पांढरे होऊ लागले आहेत. बरेच लोक पांढर्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. पांढरे केस लपवण्यासाठी डाय किंवा हेअर कलर वापरले जातात. पण केसांना वरून काळं करून फायदा नाही तर त्यासाठी आहारही तितकाच महत्त्वाचा आहे.

केसांसाठी फायदेशीर असलेल्या पदार्थांपैकी एक म्हणजे मेथी. हे तुम्हाला माहितीच आहे. मेथीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून तुम्ही पांढऱ्या केसांपासून मुक्ती मिळवू शकता.

मेथीचे दाणे पाण्यात घालून उकळून या पाण्याने केस धुणे. यामुळे केसांच्या समस्या दूर होतात. मेथीचे दाणे भिजवून त्यांची पेस्ट बनवून केसांना लावा. हे 15 ते 20 मिनिटं केसांवर ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवा.

हे वाचा - Healthy Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये या गोष्टी खाणं आहे फायदेशीर; अनेक आजार राहतील दूर

याशिवाय, मेथीच्या (Fenugreek) दाण्यांचं पाणी लावल्यानं केसांशी संबंधित समस्याही दूर होतात. मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्यांचं पाणी केसांना लावा.

खोबरेल तेलात मेथी पावडर टाकून ते गरम करून या तेलानं केसांना मसाज करा. यामुळं कोंड्याची समस्या दूर होईल. मेथी दाणे भिजवून त्यात लिंबाचा रस घालून पेस्ट बनवावी. ही पेस्ट केसांना लावल्यानं केसांच्या समस्या दूर होतात. यामुळं केस चमकदार होतात.

हे वाचा - Heart Disease : तुमच्या या चुकीच्या सवयी हृदयावर आणतात एक्स्ट्रा प्रेशर, होऊ शकतात भयंकर परिणाम

तुम्ही केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर मेथी गुळात मिसळून खाण्याचा मार्ग यावर सर्वात प्रभावी आहे. यामुळे केसांची वाढही चांगली होते आणि केस गळणंही (Jaggery and Fenugreek Benefits) थांबतं.

मेथीच्या दाण्यांचं सेवन केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. त्यात गूळ मिसळून खाल्ल्यास दुप्पट फायदा होतो. यासाठी मेथीच्या दाण्यांचं चूर्ण बनवून त्याचं गुळासोबत सेवन करावं.

हे वाचा - Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी चुकूनही या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका, या आजारांचा धोका

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Beauty tips, Health Tips, Lifestyle, Woman hair