मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बेसन नाही! ‘या’ पिठानेही होईल त्वचा सुंदर; चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही होतील कमी

बेसन नाही! ‘या’ पिठानेही होईल त्वचा सुंदर; चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही होतील कमी

त्यामुळे आपण कितीही ब्युटी प्रॉडक्ट लावले तरी, त्यांचा परिणाम चांगला होतोच असं नाही. चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी अनेक होम रेमेडी केल्या असतील तरीदेखील हे सोपे उपाय करून पहा. यामुळे त्वचा तजेलदार दिसायला लागेल.

त्यामुळे आपण कितीही ब्युटी प्रॉडक्ट लावले तरी, त्यांचा परिणाम चांगला होतोच असं नाही. चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी अनेक होम रेमेडी केल्या असतील तरीदेखील हे सोपे उपाय करून पहा. यामुळे त्वचा तजेलदार दिसायला लागेल.

चेहऱ्याची काळजी (Skin Care) घेताना तुम्ही अनेक प्रकारचे फेस पॅक (Face Pack) वापरले असतील पण, या फेस पॅक कधीच लावला नसेल...

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : नितळ सुंदर त्वचेचं स्वप्न जेव्हा चेहऱ्यावर सुरकुत्या (wrinkles) यायला लागतात तेव्हा भंग व्हायला लागतं. ब्लॅकहेड्स, पिंपल्स, डार्क सर्कल, चेहऱ्यावरील डाग, चेहऱ्याची त्वचा लूज होणं किंवा सुरकुत्या हे स्किन प्रॉब्लेम (Skin Problem) प्रत्येक महिला आणि पुरुषांना होतात. अशावेळेस आपण अनेक प्रकारचे क्रिम, फेस वॉश, होम रेमेडीज वापरून बघतो. त्यातल्या काहींचाच आपल्याला उपयोग होतो. वेळेआधी चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागल्या तर खूप टेन्शन (Tension) येतं. सुरकुत्यांमुळे चेहरा म्हातारा (Aging) वाटायला लागून वय जास्त दिसायला लागतं. चेहर्‍यावर सुरकुत्या पडत असतील तर, गव्हाच्या पिठाचा वापर फार फायदेशीर  (Benefits Of Wheat Flour) आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सिडंन्ट (Antioxidant) गुण असतात. ज्यामुळे त्वचा टाईट (Skin Tight) होतो. पहा चेहऱ्यासाठी गव्हाच्या पिठाचा फेस पॅक (Wheat Face Pack) कसा उपयोगी ठरतो.

(‘या’ सवयी आधी बंद करा; कोणत्याही क्रीमशिवाय चेहरा दिसेल तरुण)

गव्हाच्या पिठाचा फेस पॅक सकाळच्या वेळी वापरल्याने जास्त फायदा होतो. या फेस पॅकने चेहरा हायड्रेट होतो. मात्र, त्वचा एक्सफोलीएट करण्यासाठी किंवा स्क्रब फेसपॅक म्हणून वापरायचा असेल तर, रात्रीच वापरावा. हा फेस पॅक बनवण्यासाठी गव्हाचं पिठ, कॉफी आणि दुधाचा वापर केला जातो. हे उत्तम एक्सफोलीएटर आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वापरावं.

(मास्कसारखंच काम करतात नाकातील केस; कोरोना काळात Nose waxing ठरू शकतं घातक)

अ‍ॅन्टीएजिंग फेस पॅक

यासाठी कॉफी पावडर आणि गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो. 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा कॉफी पावडर एकत्र करा. गव्हाचं पिठ आणि कॉफी पावडर एकत्र झाल्यानंतर यामध्ये 4 चमचे दूध घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. 5 मिनिटं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. त्यानंतर 10 मिनिटांनी वाळल्यानंतर चेहरा पाण्याने धुऊन स्वच्छ करा. हा एक अ‍ॅन्टीएजिंग फेस पॅक आहे. त्यामुळे आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापरता येऊ शकतो.

(दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! फक्त 7 सेकंदात या फोटोतले 4 किडे शोधा)

फेस पॅकचे फायदे

हा फेस पॅक तेलकट त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे पिंपल्स आणि डाग कमी होतात. चेहऱ्याची त्वचा घट्ट होते. त्वचेवरच्या मृतपेशी आणि घाण निघून जाते. सनबर्न कमी होऊन त्वचेचा रंग उजळतो. चेहर्‍यावरचे अनावश्यक केस रिंकल्स आणि डार्क सर्कल कमी होतात.

First published:
top videos

    Tags: Home remedies, Lifestyle, Skin care