ना थ्रेडिंग ना वॅक्स; फक्त 4 घरगुती उपायांनी Upper lips hair पासून मिळवा मुक्ती

ना थ्रेडिंग ना वॅक्स; फक्त 4 घरगुती उपायांनी Upper lips hair पासून मिळवा मुक्ती

अनेकदा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्यावरील आणि ओठांवरील केस (Upper Lips hair) काढताना जखमा किंवा त्वचेचं इन्फेक्शन देखील होऊ शकते. पण घरच्या घरी तुम्हाला हे टाळता येऊ शकतं.

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी : महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक ब्युटी प्रॉडक्ट्चा (Beauty Product) वापर करत असतात. यामध्ये चेहऱ्याच्या विविध क्रीमचा देखील समावेश असतो. परंतु अनेकदा चेहऱ्यावरील केसांमुळे सौंदर्यात अडथळा येतो. यासाठी अनेक प्रकारे तुम्ही हे नको असलेलं केस काढून टाकू शकता. अनेकदा चेहऱ्यावरील आणि ओठांवरील (Upper Lips) हे केस काढताना जखमा किंवा त्वचेचे इन्फेक्शन देखील होऊ शकते.

आज आम्ही तुम्हाला यासाठी काही घरगुती पद्धती सांगणार असून या मदतीने तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये न जाता चेहऱ्यावरील केस काढू शकता.

1) दही, बेसन आणि हळदीचं मिश्रण

या पदार्थांचं मिश्रण चेहऱ्यावरील नको असलेले केस हटवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. चेहऱ्यावरील अनेक डाग देखील यामुळे नष्ट असतात. टॅनिंगची समस्या देखील कमी होते. हे मिश्रण अँटिइन्फ्लेमेटरी, अँटिमाइक्रोबायल आणि अँटिसेप्टिक असल्यानं चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे.

यासाठी एक चमचा बेसन पावडर, एक चमचा दही आणि एक चिमटीभर हळद एकत्र करावी. हे सगळे पदार्थ एकत्र करून याचं मिश्रण तयार करावं. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर आणि ओठांवरील भागांवर लावावं. 15 ते 20 मिनिटांनंतर हे मिश्रण काढून थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. काही वेळा हे मिश्रण लावल्यावर याचे परिणाम तुम्हाला दिसायला लागतील.

2) हळद आणि दुधाचं मिश्रण

हळद (Turmeric) आणि दुधाचा (Milk) लेप देखील ओठांवरील नको असणारे केस काढण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचं मिश्रण करून चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावर तेज येतं. दुधामध्ये त्वचेची काळजी घेण्याचे गुणधर्म असतात. त्याचबरोबर हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि ब्लिचिंग(Bleach) गुणधर्म असतात. त्यामुळे याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास नको असलेले केस निघण्यास मदत होते.

हे वाचा - गर्भनिरोधक गोळ्या ठरतील धोकादायक, महिलांच्या SEX लाइफवर देखील होतो परिणाम

यासाठी एक चमचा हळद आणि एक चमचा दूध घेऊन त्याचे मिश्रण तयार करावं. हे मिश्रण तुमच्या ओठाच्या वरील भागांवर लावावे.अर्धा तास चेहऱ्यावर हा लेप तसाच राहून द्या. त्यानंतर हे मिश्रण काढून थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. काही वेळा हे मिश्रण लावल्यावर याचे परिणाम तुम्हाला दिसायला लागतील.

3) लिंबू आणि साखरेचं मिश्रण

लिंबामध्ये (Lemon) ब्लिचिंगचे गुणधर्म आणि साखरेमध्ये (Sugar) त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे गुणधर्म आहेत. यामुळे या दोन्हीचे मिश्रण करून चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. ओठावरील भागावर लावल्याने केस कमजोर होतात. यामुळे तुम्ही ब्युटी पार्लरलमध्ये न जातादेखील या केसांचा उपचार करू शकता.

यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा साखर घेऊन त्याचं मिश्रण तयार करावं. लिंबू आणि साखरेचं मिश्रण तयार करून ते ओठाच्या वरील भागावर लावावं. 15 मिनिटं हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवा. तुम्हाला याचा प्रभाव नक्की दिसू लागेल.

4) मध आणि लिंबाचं मिश्रण

मधाचे(Honey) आणि लिंबाचे(Lemon) मिश्रण देखील नको असलेले हे केस हटवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. लिंबामध्ये ब्लिचिंग गुणधर्म असतात त्याचबरोबर मधामध्ये चिकट गुणधर्म असल्याने याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने केस हटवण्यास मदत होते.

हे वाचा - जगातली 8 ठिकाणं, जिथे हिवाळ्यातही नसते थंडी आणि तरीही वर्षभर असते मस्त हवा

हे मिश्रण तयार करण्यासाठी एक मोठा चमचा लिंबाचा रस घेऊन त्यामध्ये एक चमचा मध आणि अर्धा कप गरम पाणी एकत्र करून याचं मिश्रण तयार करावं. हे मिश्रण तुम्ही ओठावरील भागावर लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटं तसंच ठेवावं. त्यानंतर एक कॉटनचं कापड गरम पाण्यात भिजवून चेहऱ्यावरून हळूच ओढत काढून घ्यावा. यामुळे तुमचे ओठावरील नको असलेले केस गळून पडतील.

Published by: Priya Lad
First published: January 7, 2021, 11:43 AM IST

ताज्या बातम्या