मुंबई, 12 डिसेंबर : रात्री झोपताना घोरण्याची (Snoring) समस्या आजकाल इतकी सामान्य बनली आहे की, आता याला समस्या समजणे सोडून अनेकांनी सोडून दिलं आहे. घोरणार्या व्यक्तीला हे त्रासदायक वाटत नाही, परंतु जो कोणी त्या व्यक्तीच्या आसपास झोपतो त्याला नाहक त्रास होतो. तुमच्या घरातही कोणीतरी जोर-जोरात घोरत असेल तर तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
खरंतर घोरणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही, त्यासाठी त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. मात्र, त्यापूर्वी तुम्ही काही घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीने ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. याबाबत आपण आजीच्या काळातील काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरच्या घरी घोरण्याची समस्या दूर करू शकता.
घोरण्याचे कारण
घोरण्याच्या समस्येमागे अनेक कारणे आहेत. लठ्ठपणा, नाक आणि घशाचे स्नायू कमकुवत होणे, सर्दी, धूम्रपान, श्वसनाच्या समस्या, फुप्फुसात योग्य ऑक्सिजनची कमतरता आणि सायनसच्या समस्या ही त्याची सुरुवातीची कारणे आहेत.
घरगुती उपाय
1. पुदिना
कोमट पाण्यात पुदिना (peppermint) ऑइल टाकून गुळन्या केल्यास घोरण्याची समस्या काही दिवसात दूर होऊ शकते. याशिवाय कोमट पाण्यात पुदिन्याची पाने उकळून प्यायल्यास घोरण्याची समस्या हळूहळू दूर होऊ शकते.
2. दालचिनी
एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन ते तीन चमचे दालचिनी पावडर घाला आणि प्या. असे काही दिवस सतत करत राहिल्यास फरक जाणवेल.
हे वाचा - श्रीमंत खासदाराची मालमत्ता जप्त, SBI बँकेनं घेतली Action; 53 कोटींचं कर्ज Pending
3.लसूण
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लसणाची एक पाकळी घेऊन कोमट पाण्यासोबत गुळणी करावी, त्यामुळे घोरण्यापासून आराम मिळेल.
4. ऑलिव्ह तेल
नाकात ऑलिव्ह ऑइल लावल्याने श्वासनाचा त्रास दूर होतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब नाकात टाकावेत. यामुळे घोरण्याची समस्याही हळूहळू दूर होते.
हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत
5. देशी तूप
देसी तुपाच्या माध्यमातून तुम्ही घोरण्याच्या समस्येवरही मात करू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम देशी तूप हलके गरम करावे लागेल. यानंतर तुपाचे काही थेंब नाकात टाकल्याने घोरण्याची समस्या कमी होते.
6.हळद
हळदीच्या वापराने नाक साफ करता येते. यामुळे श्वास घेणे सोपे होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात एक चमचा हळद टाकून प्या.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips