मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Onion Remedies : खरंच सॉक्समध्ये कांदा घालून झोपल्यानं ताप कमी होतो?

Onion Remedies : खरंच सॉक्समध्ये कांदा घालून झोपल्यानं ताप कमी होतो?

सॉक्समध्ये कांदा घालून झोपणं याला  काही लोक सर्दी आणि फ्लूसारख्या संसर्गावर एक खात्रीशीर उपाय मानतात.

सॉक्समध्ये कांदा घालून झोपणं याला काही लोक सर्दी आणि फ्लूसारख्या संसर्गावर एक खात्रीशीर उपाय मानतात.

सॉक्समध्ये कांदा घालून झोपणं याला काही लोक सर्दी आणि फ्लूसारख्या संसर्गावर एक खात्रीशीर उपाय मानतात.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 23 डिसेंबर : सॉक्समध्ये कांदे (Onion in socks) घालून झोपणे थोडे विचित्र वाटू शकते (Sleeping with Onion in socks) . परंतु, काही लोक याला सर्दी आणि फ्लूसारख्या संसर्गावर एक खात्रीशीर उपाय मानतात. असे मानले जाते की, जर तुम्ही मोज्यांमध्ये कांदे घालून झोपलात तर सकाळी तुमचा ताप बरा होतो (Fever home remedies). कांद्यामध्ये सल्फ्यूरिक संयुगे मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे त्याला तीव्र वास येतो. जेव्हा तुम्ही ते पायाखाली ठेवता तेव्हा ही संयुगे शरीरात जातात आणि बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करून रक्त (Onion Home Remedy) शुद्ध करतात, असं सांगितलं जातं. पण खरंच असं होतं का?

पायात किंवा शरीराच्या कोणत्याही भागात कांदा ठेवल्याने फायदा होत असला तरी त्याबाबत कोणतेही संशोधन झालेले नाही.  पायाच्या रिफ्लेक्सोलॉजीमुळे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय स्थिती बरी होत असल्याचा कोणताही पुरावा नाही, परंतु यामुळे संसर्ग वाढू शकतो.  'झी न्यूज'ने हेल्थलाईन रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार शास्त्रज्ञांच्या मते, कांदा आम्लयुक्त असतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही त्याला एखाद्या गोष्टीवर घासता तेव्हा ते तुम्हाला बॅक्टेरियाविरोधी परिणाम देऊ शकतात.

आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी, फूड सायन्स अँड ह्युमन न्यूट्रिशन विभागाचे प्राध्यापक डॉ. रुथ मॅकडोनाल्ड म्हणतात की, ते ब्लीच किंवा कोणत्याही रासायनिक प्रतिजैविकांपेक्षा खूपच कमी प्रभावी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा विषाणू ह्यूमन होस्टच्या थेट संपर्कात आल्याने पसरतो, त्यामुळे कांदा विषाणूला शोषून घेतो असे म्हणता येणार नाही.

हे वाचा - Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर

सॉक्समध्ये कांदे घालून झोपल्याने तुमचे नुकसान होत नाही, पण फायदाही होत नाही. सॉक्समध्ये कांदा ठेवण्यापेक्षा त्याचा आहारात समावेश करणे चांगलं. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कांद्यामध्ये आहारातील फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे कर्करोग आणि दाहक रोगांचा धोका कमी होतो. यासोबतच कांदा व्हिटॅमिन सीचाही चांगला स्रोत आहे. कांदा रोगप्रतिकारक शक्तीचे चांगले कार्य करण्यास मदत करते. एका अभ्यासानुसार, कांदे आणि लसूणमध्ये आढळणाऱ्या ऑर्गेनोसल्फर संयुगांच्या नियमित सेवनाने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोकाही कमी होतो.

हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी

कांद्याचा पुरेपूर फायदा घेतल्याने तुमचे शरीर तंदुरुस्त राहू शकते, यासाठी तुम्ही त्याचा आहारात समावेश करणे आणि त्यासोबत फळे, भाज्या आणि कडधान्ये खाणे महत्त्वाचे आहे. याशिवाय फ्लूपासून बचाव करण्यासाठी, वारंवार हात धुणे, आजारी लोकांच्या थेट संपर्कात येण्याचे टाळणे आणि चांगली झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे.

First published:

Tags: Health, Home remedies, Lifestyle, Onion