S M L

नेलपॉलिशचे असेही फायदे

आता नेलपॉलिशचेही वेगवेगळे प्रकार आले आहेत. वेगवेगळे कलर्स आणि नेलपॉलिश लावण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स, पण याशिवाय नेलपॉलिशचे आणखी वेगळे अनेक फायदे आहेत.

Sachin Salve | Updated On: Dec 13, 2017 06:11 PM IST

नेलपॉलिशचे असेही फायदे

13 डिसेंबर : नेलपॉलिशने नखांचं सौंदर्य वाढतं. आता नेलपॉलिशचेही वेगवेगळे प्रकार आले आहेत. वेगवेगळे कलर्स आणि नेलपॉलिश लावण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स, पण याशिवाय नेलपॉलिशचे आणखी वेगळे अनेक फायदे आहेत.

- काम करताना कधी कधी खरचटलं आणि हातातून रक्त येत असल्यास खरचटलेल्या जागेवर नेलपॉलिश लावा. याने रक्त थांबण्यास मदत होते.

- वातावरणातल्या अनेक संसर्गामुळे त्वेचेला खाज येते. त्यावर नेलपॉलिश लावल्यानं ही खाज थांबण्यास मदत होईल.

- काहींची त्वचा खूप संवेदनशील असते. अशात कृत्रिम दागिने घातल्यावर त्यांच्या त्वचेला रॅशेज येतात. असं असल्यास कृत्रिम दागिन्यांवर नेलपॉलिश लावा. याने दागिने खराबही होणार नाहीत आणि त्वचेला त्रासही होणार नाही.

- कपड्यांवर कोणत्याही प्रकारचे डाग असल्यास त्यावर पारदर्शी नेलपॉलिश लावा आणि कपडे लगेच धुऊन घ्या. नेलपॉलिशने कपड्यांवरचे डाग निघून जातात.

- जुन्या चपलांचा रंग गेला असेल तर त्यावर आवडत्या रंगाचं नेलपॉलिश लावून तिला पुन्हा वापरता येऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close