Home /News /lifestyle /

Toothache: थंडीत होणाऱ्या दातदुखीमुळं त्रस्त आहात का? हे घरगुती उपाय लगेच देतील आराम

Toothache: थंडीत होणाऱ्या दातदुखीमुळं त्रस्त आहात का? हे घरगुती उपाय लगेच देतील आराम

Home Remedies For Toothache: हिवाळ्यात थंडीमुळे अनेकांना दात दुखण्याचा (Toothache) त्रास सुरू होतो. यासाठी काही घरगुती आहेत जे तुम्ही सहज वापरून पाहू शकता. जाणून घेऊया हिवाळ्यात दातदुखीचा त्रास होत असेल तर या दुखण्यापासून आराम कसा मिळवावा.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 डिसेंबर : कडाक्याच्या थंडीत दातदुखी (Toothache) सुरू झाली की फार त्रास होतो. दातदुखी रात्री-अपरात्री, पहाटे सुरू झाली तर डॉक्टरांकडे जाणेही अशक्य होते. अशावेळी आपल्याला काही घरगुती उपायांचीच मदत घ्यावी लागते. इतर प्रकारच्या वेदना सहन करता येतात, पण हिवाळ्यात दात दुखत असतील तर त्या वेदना नरक यातनांपेक्षा कमी नसतात. अनेक वेळा या कळा दातांद्वारे हिरड्यांपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर कान, डोके इत्यादींमध्ये जडपणा आणि मुंग्या (Home Remedies For Toothache) येतात. हिवाळ्यात थंडीमुळे अनेकांना दात दुखण्याचा (Toothache) त्रास सुरू होतो. यासाठी काही घरगुती आहेत जे तुम्ही  सहज वापरून पाहू शकता. जाणून घेऊया हिवाळ्यात दातदुखीचा त्रास होत असेल तर या दुखण्यापासून आराम कसा मिळवावा. दातदुखीवर घरगुती उपाय 1.लवंग लवंग अनेक घरगुती उपचारांसाठी वापरली जाते. लवंग दातांसाठीही खूप फायदेशीर ठरते. लवंगात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. लवंगाची पेस्ट किंवा लवंग तेल दातांवर लावल्यास खूप फायदा होतो. ही पेस्ट बनवण्यासाठी 3 ते 4 लवंगा घ्याव्या लागतील आणि चांगल्या बारीक कराव्या लागतील. या पेस्टमध्ये ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब टाका. अशा पद्धतीनं वेदना कमी करणारी तुमची पेस्ट तयार होते. ही पेस्ट दुखणाऱ्या भागावर लावा. तुम्हाला काही मिनिटांत आराम मिळेल. 2. कांदे अँटिसेप्टिक गुणधर्माने समृद्ध असलेला कांदा दातदुखी दूर करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. कांद्यामुळे दातांच्या आजूबाजूला असलेले जंतू नाहीसे होतात. ज्यामुळे दातदुखीमध्ये आराम मिळतो. तुम्हाला दातांमध्ये दुखत असेल तेव्हा तुम्ही दाताने कांदा चावावा. असे केल्याने कांद्यामधून निघणारा रस दात दुखीपासून आराम देतो. हे वाचा - Google वर चुकूनही Search करू नका या 5 गोष्टी, खावी लागू शकते जेलची हवा 3. हिंग दातदुखीपासून बचाव करण्यासाठी हिंगदेखील खूप गुणकारी आहे. लिंबाच्या रसात हिंग मिसळा आणि दुखणाऱ्या जागेवर लावा. काही मिनिटांत तुमच्या वेदना दूर होतील. हे वाचा - Bedroom असतं शुक्राचं स्थान, तिथं चुकूनही ‘या’ गोष्टी ठेवू नका नाहीतर… 4. मिरपूड आणि मीठ दातदुखीचा त्रास होत असेल तर काळी मिरी आणि मिठाच्या मिश्रणानेही दुखण्यापासून आराम मिळतो. यासाठी पाण्यात काळी मिरी आणि मीठ मिसळा. आता हे मिश्रण दुखणाऱ्या भागावर लावा. 5 मिनिटांत तुमच्या वेदना कमी होतील. मीठ आणि काळी मिरी पावडर मिसळून कोमट पाण्याने चुळा भरा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. )
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या