Home /News /lifestyle /

Pigmentation : चेहऱ्यावरील काळे फ्रिकल्स घालवू शकता; हे 6 घरगुती उपाय करून बघा परिणाम

Pigmentation : चेहऱ्यावरील काळे फ्रिकल्स घालवू शकता; हे 6 घरगुती उपाय करून बघा परिणाम

काही घरगुती उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने आपण त्वचेवरील फ्रिकल्सची समस्या कमी करू शकता. या उपायांचा रोजच्या स्किन केअर रूटीनमध्ये समावेश केलात तर त्याचा प्रभाव आठवड्याभरात दिसू लागतो.

    मुंबई, 27 जून : त्वचेवर डाग येण्यापासून वाचवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. पिंपल्स किंवा मुरुमांचे डाग काही दिवसातच निघू लागतात, पण जर चेहऱ्यावर काळे ठिपके (pigmentation) आले तर त्वचेचे सर्व सौंदर्य नाहीसे होऊ लागते. हे डाग इतके खोलवर काळपट असतात की, अनेक प्रयत्न करूनही सहजा-सहजी जात नाहीत. मात्र, यावर काही घरगुती उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने आपण त्वचेवरील फ्रिकल्सची समस्या कमी करू शकता. या उपायांचा रोजच्या स्किन केअर रूटीनमध्ये समावेश केलात तर त्याचा प्रभाव आठवड्याभरात दिसू लागतो. जाणून घेऊया की फ्रिकल्स (Home remedies for Pigmentation) घालवण्यासाठी आपण कोणते उपाय करू (Skin care tips) शकतो. चेहऱ्यावरील डाग (फ्रिकल्स) घालवण्यासाठी घरगुती उपाय - तुळशीची पाने आणि लिंबू - चेहऱ्यावर काळे ठिपके दिसू लागले असतील तर तुळशीची पाने बारीक करून त्यात दोन थेंब लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ राहू द्या. असे केल्याने फ्रिकल्स बऱ्याच प्रमाणात कमी होतील. कापूर आणि मुलतानी माती - सर्व प्रथम एका भांड्यात 5 ते 6 चमचे पाणी घेऊन त्यात कापूर विरघळवून घ्या. नंतर त्यात एक चमचा मुलतानी माती आणि एक चमचा मध घाला. ही पेस्ट फ्रिकल्सवर लावा. कोरडे झाल्यावर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. लिंबू आणि मलई - रोज सकाळी फ्रेश मलई (क्रीम) आणि त्यात लिंबाचा रस मिसळा. मिश्रण चेहऱ्याला लावा काही वेळ चेहऱ्यावर राहू द्या. एक आठवडा दररोज असे केल्याने आपल्याला परिणाम दिसेल. हे वाचा - ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या सफरचंद आणि पपई - सफरचंद आणि पपईचा एक चमचा लगदा काढा आणि चेहऱ्यावर लावा. या दोन्ही फळांमध्ये असे काही घटक आढळतात जे डाग घालवण्याचे काम करतात. बटाट्याचा रस - बटाटा बारीक करून त्याचा रस काढा. कापसाच्या मदतीने ते फ्रिकल्सवर लावा. कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हे वाचा - नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा गाजर आणि मुलतानी माती - गाजर खिसून घ्या. त्यात मुलतानी माती घाला आणि एक चमचा लिंबाचा रस देखील घाला. मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी धुवा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Skin, Skin care

    पुढील बातम्या