सतत आजारी पडत असाल तर या 5 पानांचा करा वापर, आजारांपासून राहाल दूर

सतत आजारी पडत असाल तर या 5 पानांचा करा वापर, आजारांपासून राहाल दूर

अॅलर्जी झाली असेल किंवा सर्दी, पोट दुखी अशा आजारांवर अनेकदा ठोस असा कोणताही वैद्यकीय उपचार नसतो. अशावेळी रुग्ण तर हैराण होतोच पण छोट्या आजारांमुळे शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त प्रमाणात होतो.

  • Share this:

अॅलर्जी झाली असेल किंवा सर्दी, पोट दुखी अशा आजारांवर अनेकदा ठोस असा कोणताही वैद्यकीय उपचार नसतो. अशावेळी रुग्ण तर हैराण होतोच पण छोट्या आजारांमुळे शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त प्रमाणात होतो. पण अशा सततच्या आजारां पुढील पाच पानं आहेत रामबाण उपाय. कडूलिंब, तुळस, बाभूळ, वड आणि बोराची पानं फार गुणकारी असतात. घरगुती उपचार म्हणून या पानांचा उपयोग केला जातो. त्वचारोगपासून ते केस गळतीपर्यंतच्या अनेक समस्यांवर ही पानं रामबाण उपाय आहेत.

कडूलिंबाचं पान हे फार गुणकारी आहे. सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची 10-12 पानं कुटून त्याचा रस प्या. यामुळे त्वचारोग होणार नाही. याशिवाय कडूलिंबाची पानं उकळून त्या पाण्याने आंघोळ केली तर केस गळतीच्या समस्या उद्भवणार नाहीत. तसेच केसात कोंडा आणि उवा होणार नाहीत.

तुळशीची पानं टाकलेला चहा प्यायल्याने सर्दी- खोकला बरा होतो. रोज सकाळी तुळशीच्या पानांचा चहा नियमित प्यायला तर आपसूक अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहता. कडूलिंब आणि तुळशीच्या पानांसोबतच बाभळाची पानंही अत्यंत गुणकारी आहेत. ही पानं पाण्यात उकळून त्याच्या गुळण्या केल्या तर दात आणि हिरड्या मजबूत होतात.

कडूलिंबाच्या पानांप्रमाणे बोराची पानंही केस गळतीसाठी उपयुक्त आहेत. कडूलिंबाची पानं आणि बोराची पानं एकत्र वाटून त्याचा रस केसांना लावला तर केस मजबूत होतात आणि केस गळतीची समस्या दूर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 06:30 PM IST

ताज्या बातम्या