नवी दिल्ली, 09 जानेवारी : हिवाळ्यात थंड वारे त्वचेची आर्द्रता वेगाने शोषून घेतात. अनेक वेळा क्रीम आणि लोशन लावल्यानंतरही हात, पाय आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा
(Dry Skin in Winter) कमी होत नाही. त्यामुळे चेहरा निर्जीव आणि निस्तेज दिसू लागतो. कधी-कधी कोरडेपणामुळे त्वचेवर रॅशेस आणि बारीक रेषा येतात त्यामुळे लहान वयातच आपण वयस्क
(Home Remedies For Dry Skin in Winter) दिसू लागतो.
तुम्हालाही हिवाळ्यात या समस्येचा सामना करावा लागत असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही त्वचेचे पोषण करू शकता. त्वचेचे पोषण नीट झाल्यास चेहरा अधिक मुलायम आणि चमकदार बनतो. अशा स्थितीत त्वचेच्या जास्त कोरडेपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय (Home Remedies For Dry Skin) अवलंबू शकता, जाणून घेऊया.
1. केळी
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होत असेल तर आठवड्यातून दोन दिवस केळीचा मास्क चेहऱ्यावर लावा. यासाठी केळी चांगले मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. थोडावेळ तसेच राहु द्या आणि नंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याची कोरडी त्वचा कमी होईल आणि चेहरा मुलायम होईल.
2. दही
दह्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे त्वचेला तेजस्वी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड देखील असते जे कोरडेपणा दूर करते. दही थेट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 10 मिनिटे मसाज करा. त्यानंतर ते पाण्याने धुवावे.
3. मध
कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी मध खूप फायदेशीर आहे. एका भांड्यात एक चमचा मध घ्या आणि स्वच्छ चेहऱ्यावर चांगले लावा. सुमारे 10 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
हे वाचा - Men’s Health 40 : तुम्हीही चाळिशी पार केलीय? मग आहारात या 5 गोष्टी असायलाच हव्यात
4. ऑलिव्ह ऑइल
थंड दुधात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा. आता कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि लवचिक राहील.
5. बदाम तेल
एका भांड्यात बदाम तेल आणि मध समप्रमाणात मिसळा आणि चेहऱ्यावर 10 मिनिटे मसाज करा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. त्यामुळे त्वचा कोमल आणि मुलायम बनेल.
हे वाचा - कांदा-लसूण खाल्ल्यानंतर चार-चौघात तोंड उघडण्याची होते पंचाईत? दुर्गंधी घालवण्याचे हे आहेत उपाय
6. दूध
दुधाची साय (मिल्क क्रीम) वापरल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. यासाठी एक चमचा तिळाच्या तेलात थोडी दुधाची साय मिसळा. चेहऱ्यावर आणि हात-पायांवर लावा. आपण इच्छित असल्यास, आपण दररोज सकाळी किंवा रात्री हा उपाय करू शकता. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो, तसेच कोरडेपणा नाहीसा होतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.