महागडे शँपू नाही; या 5 घरगुती गोष्टी ठेवतील तुमचे केस डँड्रफपासून मुक्त

हिवाळ्यात कोरड्या हवेनं कोंडा होण्याचं प्रमाण वाढतं. त्यावर इलाज सोपा आहे. अगदी साध्या घरगुती पदार्थांचा वापर करून डँड्रफची समस्या तुम्ही कायमची संपवू शकता.

  • Share this:

केसांत कोंडा होणं किंवा डँड्रफमागे अनेक कारणं आहेत. कोरड्या हवेत, हिवाळ्यात ही समस्या बळावते. वातावरणातला बदल, चुकीचा शॅम्पू किंवा कंडिशनर वापरणं. यामुळेही कोंडा होतो.

कुठल्या महागड्या शँपूने नव्हे, तर घरगुती पदार्थांचा वापर करून डँड्रफची समस्या दूर करू शकता. ऑलिव्ह ऑइल आणि नारळाचं तेल सम प्रमाणात घ्या. ते मिश्रण केसांच्या मुळांना लावत हलक्या हाताने मॉलिश करा. डँड्रफ राहणार नाही.

दह्यामुळेही डँड्रफची समस्या दूर होते. केस धुण्याआधी सुरुवातीला केसांना दही लावा. अर्ध्या तासांनी केस कोमट पाण्याने धुवा.

खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून त्याने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. मग केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळेही डँड्रफची समस्या दूर पळते.

तुळस आणि आवळ्याची पावडर एकत्र करा. ती पावडर तेलात एकत्र करून डोक्याला लावा. अर्ध्या तासाने केस कोमट पाण्याने धुवा.

दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि चार चमचे दही एकत्र करा. हे मिश्रण डोक्याला लावा. यामुळेही डँड्रफ कमी होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2020 07:47 AM IST

ताज्या बातम्या