अंगदुखी असेल तर, पेनकिलर घेण्याआधी हे घरगुती उपाय करून पाहा

अंगदुखी असेल तर, पेनकिलर घेण्याआधी हे घरगुती उपाय करून पाहा

अंगदुखी असेल तर थेट पेनकिलर घेण्यापेक्षा घरगुती उपचार आणि व्यायाम यांचा उपयोग करून पाहायला हवा.

  • Last Updated: Aug 5, 2020 06:40 PM IST
  • Share this:

कामाची व्यस्तता आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष त्यामुळे अनेक लोक आपल्या शरीराचे नुकसान करतात. सुरुवातीला त्याचे काही वाटत नाही पण जसा शरीराला अधिक त्रास होऊ लागतो. तशी अंगदुखी वाढू लागते. जर त्याला वेळीच पायबंद घातला नाही तर समस्या मोठ्या होतात. अनेकदा लोक वेदनाशामक स्टेरोईड घेतात, पण कालांतराने किडनीच्या समस्या सुरू होतात. जर अंगदुखी असेल तर अशी औषधे घेण्यापेक्षा घरगुती उपचार आणि व्यायाम यांचा उपयोग करून पाहायला हवा.-

पाठीतील वेदना

आजकाल लोक ऑफिसमध्ये तासंतास बसून काम करतात, अश्या 10 पैकी 6 लोकांना पाठ आणि कंबरेच्या वेदना होतात. अनेकदा पाठीचे दुखणे अयोग्यरित्या झोपण्याने पण होतात. पाठीच्या मधल्या भागातील वेदना जास्त त्रास देतात. अश्यावेळी उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डावा हात उजव्या खांद्यावर ठेऊन पाठीत जाणवेल एवढा दीर्घ श्वास घ्या. असे दोन तीनवेळा करा त्याने आराम मिळेल. myupchar.com चे AIMMS शी संबंधित डॉ. केएम नाधिर यांच्यानुसार, जर पाठीत वेदांना असतील तरी आपल्या हालचाली मर्यादित ठेवू नका.

हात आणि मनगट दुखणे

सतत मोबाइल आणि संगणकावर काम केल्याने हात दुखू लागतात. असे झाले तर दोन्ही मनगटे घड्याळ्याच्या काट्याचा प्रमाणे उलट सुलट फिरवा. असे 8-10 वेळा करा. याने हाताच्ही स्नायू लवचिक होतात आणि हातातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. वेदना कमी होतात.

गुडघे दुखणे

एका विशिष्ट वयानंतर गुडघे दुखण्याची समस्या सुरु होते. आजकाल ही समस्या तरुणांमध्ये पण दिसून येते, याचे कारण म्हणजे संगणकावर काम करण्यासाठी तासनतास बसून राहणे. जर अशी गुडघेदुखी असेल तर खुर्चीवर बसल्यावर अधून मधून पायांची स्थिती बदलत राहा. कंबर आणि पाठ सरळ ठेवा आणि पाय सरळ जमिनीवर टेकवून ठेवा. सत्तात काम करण्या ऐवजी, 10 ते 15 मिनटे चाला.

खांदे आणि मानेच्या वेदना

संगणकावर वाकून सतत काम केल्याने खांदे आणि मानेत दुखायला लागते. अनेकदा ताण पडल्याने सुद्धा खांदे दुखतात. पण काही लहान-लहान व्यायाम केल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते. खांद्यांना कानाजवळ आकसा, आणि दीर्घ श्वास घ्या असे 10 वेळा करा, त्यांने खांद्याच्या वेदना कमी होतील.

या गोष्टींची काळजी घ्या

myupchar.com चे ऐम्सशी संबंधित डॉ. केएम नाधिर यांच्यानुसार, वेदना गंभीर स्वरूप धारण करे पर्यंत वाट पाहू नका. वेळीच उपचार करा.सतत संगणक आणि मोबाईलचा उपयोग करू नका. झोपण्याची स्थिती योग्य राहील याची काळजी घ्या. कारण अनेकदा अयोग्य स्थितीत झोपल्याने अंग दुखते. पोषक आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा त्यानी अंगदुखी होत नाही. नेहमी तणावमुक्त राहा.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - अंगदुखी: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 5, 2020, 6:40 PM IST

ताज्या बातम्या