मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Home Remedies : सफेद कपड्यांवरील डागांना कंटाळला आहात? मग 'या' टीप्स वापरा; फायदा तुमचाच

Home Remedies : सफेद कपड्यांवरील डागांना कंटाळला आहात? मग 'या' टीप्स वापरा; फायदा तुमचाच

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आम्ही तुम्हाला असे काही हॅक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कपड्यांवरील डाग हे कपड्यांना खराब न करता काढू शकता. चला जाणून घेऊ टीप्स

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 04 सप्टेंबर : कपडे म्हटलं की त्यावर डाग तर येणारच. परंतू बऱ्याचदा छोट्या-मोठ्या डागांमुळे लोकांवर नवीन कपडे किंवा महागडे कपडे टाकून देण्याची वेळ येते. त्यात सफेद कपडे म्हटलं की, त्यांना खूपच सांभाळावं लागतं. कारण त्यावरती घामाचे डाग देखील लगेच दिसतात आणि यावरील डाग काढणं हे फार कठीण काम आहे कारण ब्रशने घासलेले डाग लगेच दिसतात. त्यामुळे अनेक लोकांसाठी कपड्यांवरील डाग ही खूप मोठी समस्या बनली आहे.

पण काळजी करु नका, आम्ही तुम्हाला असे काही हॅक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कपड्यांवरील डाग हे कपड्यांना खराब न करता काढू शकता. चला जाणून घेऊ टीप्स

लिंबू

घामाचे डाग सहज आणि स्वस्तात स्वच्छ करण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि डाग असलेल्या भागावर लावा आणि नंतर तो भाग धुवा. यामुळे कपड्यांवरील डाग नक्कीच कमी होईल.

हे वाचा : Jilebi Recipe : दसऱ्याला फक्त 15 मिनिटांत घरीच बनवा रसरशीत, कुरकुरीत जिलेबी; ही आहे सोपी रेसिपी

बेकिंग सोडा

कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा खूप प्रभावी आहे. घामाचे डाग घालवण्यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून देखील बेकिंग सोडा वापरू शकता.

पांढरे व्हिनेगर

कपड्यांवरील घामाचे डाग घालवण्यासाठी कपडे धुताना कोमट पाण्यात एक कप पांढरा व्हिनेगर मिसळा आणि मग त्यामध्ये कपडे भिजत घाला. यामुळे कपडे स्वच्छ होतात.

हे वाचा : Diwali 2022 : दिवाळीसाठी घराची साफसफाई करताना वापरा ‘या’ टिप्स, झटपट होईल पूर्ण काम

लिक्विड डिटर्जंट

कपड्यावर डाग पडल्यानंतर लगेच कोमट पाण्यात भिजवा, नंतर कपडा पाण्यातून काढून त्यावर लिक्विड डिटर्जंट लावा आणि 5-10 मिनिटे तसंच राहू द्या. यानंतर मऊ ब्रशच्या साहाय्याने डाग घासून स्वच्छ पाण्याने कापड धुवा. डाग लवकरच साफ करते.

सोडा

सोडाच्या पाण्यात कपडे पूर्ण 10 मिनिटे भिजत ठेवा. यामुळे तुमच्या कपड्यांवरील डाग तर दूर होतीलच शिवाय त्या कपड्यांमधून छान सुगंधही येईल.

First published:

Tags: Home remedies, Lifestyle, Top trending