मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पेट्रोलियम जेलीचे 4 वापर माहिती आहेत का? मेकअप काढणं,दाढी करणं होईल सोपं

पेट्रोलियम जेलीचे 4 वापर माहिती आहेत का? मेकअप काढणं,दाढी करणं होईल सोपं

घरात पडून राहिलेली पेट्रोलियम जेली (Petroleum Jelly) या प्रकारे उपयोगाता आणा. डोळ्यांवर लावल्यास सहजपणे आय मेकअप निघतो.

घरात पडून राहिलेली पेट्रोलियम जेली (Petroleum Jelly) या प्रकारे उपयोगाता आणा. डोळ्यांवर लावल्यास सहजपणे आय मेकअप निघतो.

घरात पडून राहिलेली पेट्रोलियम जेली (Petroleum Jelly) या प्रकारे उपयोगाता आणा. डोळ्यांवर लावल्यास सहजपणे आय मेकअप निघतो.

नवी दिल्ली, 29 जुलै: सगळ्यांच्याच घरांमध्ये पेट्रोलियम जेली (Petroleum Jelly) सहजपणे मिळते. थंडीच्या दिवसांमध्ये पेट्रोलियम जेलीचा जास्त वापर केला जातो. ओठ फुटणे, पायांना भेगा पडणे, थंडीमध्ये स्कीन ड्राय (Dry Skin) होणं यावर पेट्रोलियम जेली हा एक चांगला उपाय आहे. याशिवाय स्किन रॅशेसमध्ये सुद्धा (Skin ashes) पेट्रोलियम जेली लावता येते. सेमी सॉलिड जेली हे खनिज तेल आणि मेण (Mineral Oil & Wax) एकत्र करून तयार केली जाते. थंडीच्या दिवसात वापरून जालेली बाटली तशीच पडून राहिली असेल तर, या प्रकारे पेट्रोलियम जेली आपल्या अनेक कामांमध्ये वापरा.

नखं आणि क्‍यूटिकल्‍स रिहायड्रेट करण्यासाठी

नखांजवळची त्वचा जाड झाली असेल, त्याभागात आग व्हायला लागली असेल तर, वेळीच उपाय केला नाही तर तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. त्या भागावर पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. ज्यांची नखं कडक होऊन तुटतात अशा लोकांनी नखांवर पेट्रोलियम जेली लावावी. ज्यामुळे नखं आणि त्यांच्या जवळची त्वचा मऊ होते.

(वेळीच ओळखा ‘Torch Infection’चा धोका; गर्भाच्या वाढीवर होतो भयंकर परिणाम)

आय मेकप रिमूवर

डोळ्यांना केलेला मेकअप सहजासहजी निघत नाही. त्यातच वॉटरप्रूफ मेकअप काढणं सर्वात जास्त कठीण गोष्ट असते. यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करता येऊ शकतो. पेट्रोलियम जेली हलक्या हातांनी डोळ्यांवर लावा कापसाने किंवा टिशू पेपरने डोळे सावकाश पुसा. यामुळे डोळ्यां जवळच्या त्वचेला किंवा डोळ्यांना कोणतंही नुकसान होत नाही.

(असे ओळखा 'होम रेमेडीज' करताना होणारे Side Effects; टाळा त्वचेचं नुकसान)

हेअर डायचे डाग टाळण्यासाठी

केसांना हेअर डाय लावताना जर त्वचेवर लागलं तर त्याचे डाग राहून जातात. असे डाग लागू नयेत यासाठी पेट्रोलियम जेली वापरा. केसांना हेअर कलर करण्याआधी किंवा डाय लावण्याआधी चेहरा मान कान या भागांवर पेट्रोलियम जेली लावून घ्या. म्हणजे या ठिकाणी डाग पडला तरीदेखील डाग राहणार नाहीत.

(दररोज अंघोळ करणं बरं नव्हे; हेल्दी राहण्याऐवजी उलट आजारीच पडाल)

दाढी करताना वापरा

दाढी करताना जखम होत असेल तर पेट्रोलियम जेली वापरू शकता. दाढी करताना पेट्रोलियम जेली लावली तर, अगदीच सहजपणे शेविंग करता येते.

First published:
top videos

    Tags: Home remedies, Skin care