दिल्ली, 10 जून : हवामान बदलने त्वचेचे अनेक प्रॉब्लेम्स (Skin Problem) देखील वाढायला लागतात. उन्हाळ्यामध्ये त्वचा तेलकट (Oily Skin) व्हायला लागते. तर हवामान थंड व्हायला लागलं की त्वचा कोरडी (Dry Skin) होऊ लागते. त्यामुळे वातावरणामुळे त्वचेवर होणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी योग्य वेळी योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी. आपण सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ करतो. मॉश्चरायझर लावतो, सन्सक्रीन लावतो. मात्र रात्री चेहरा स्वच्छ करायला विसरतो.
खरंतर चेहऱ्याला रात्री देखील काळजीची (Night Routine Care) गरज असते. वाढत्या वयानुसार त्वचेवर परिणाम (Effect On Skin) व्हायला लागतो. योग्य वयात त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचेवर वांग, काळी वर्तुळं आणि सुरकुत्या यांसारखे परिणाम दिसायला लागतात. यासंदर्भात हर जिंदगीमध्ये माहिती देण्यात आली आहे.
रोजच्या धावपळीमध्ये (Daily Rush) चेहऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर रात्री झोपतांना चेहर्याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर रूटीने (Skin Care Routine) बनवा.
तेककट त्वचा
त्वचा तेलकट असेल्यांनी दिवसाबरोबर रात्रीदेखील आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तेलकट त्वचेवर पिंपल्स समस्या देखील मोठ्या प्रमाणात येतात. स्किन पोर्सची साईज छोटी करण्यासाठी नाईट केअर रूटीनसाठी मुलतानी मातीचा एखादा फेस पॅक वापरू शकता. एक चमचा मुलतानी माती, एक छोटा चमचा लिंबाचा रस आणि एलॉवेरा जेल एकत्र करून पेस्ट तयार करा.
(पावसात तुमचा फोन, टॅब, लॅपटॉप कसा ठेवाल सुरक्षित, वाचा सोप्या Tips)
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटानंतर ओल्या हाताने मसाज करत हा पॅक काढून टाका. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर जरूर लावा. लक्षात ठेवा हा फेसपॅक जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नये. मुलतानी मातीमुळे चेहऱ्यातलं अतिरिक्त तेल शोषलं जातं. पिंपल्स आणि सुरकुत्या यांसारखे त्रास होत नाहीत.
कोरडी त्वचा
रात्री झोपतांना कोरड्या त्वचेला हायड्रेट करणं आवश्यक आहे. त्यासाठी रात्री झोपताना चेहऱ्यावर नारळ पाण्याचा टोनर म्हणून वापर करू शकता. चेहरा धुतल्यानंतर हे टोनर चेहर्यावर लावा. याशिवाय विटामिन सी जास्त प्रमाणात आहारात असू द्या. त्यामुळे वांग येण्याचा सारखा त्रास होणार नाही. मॉइश्चरायझर म्हणून कोरफड जेलचा वापर करू शकता,. एलोवेरा जेलमध्ये झिंक आणि ऍस्ट्रिजेंट असतं त्यामुळे चेहरा तजेलदार बनतो.
(‘रिम झिम गिरे सावन’; शंकर महादेवन यांनी गाण्यातून मुलासोबत घेतला पावसाचा आनंद)
कॉम्बिनेशन स्किन
कॉम्बिनेशन्स स्किन चांगली त्वचा मानली जाते कॉम्बिनेशन स्किन म्हणजे ऑयली आणि ड्राय स्कीनचा बॅलन्स असतो. कॉम्बिनेशन स्किन असणार्यांनी देखील आपल्या त्वचेची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्यासाठी कॉफी आणि व्हिटॅमीन ई ऑईलचा समावेश आपल्या नाईट रूटीनमध्ये करावा. यासाठी एक चमचा कॉफी पावडर, एक छोटा चमचा मध, दोन थेंब व्हिटॅमीन ई एकत्र करून दोन मिनिटं स्क्रबप्रमाणे चेहऱ्यावर मसाज करावा. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर करावा. दररोज रात्रीही वापरू शकता. याशिवाय व्हिटॅमीन ई आणि गुलाब पाणी एकत्र करून झोपण्याआधी 5 मिनिट चेहऱ्यावर लावून मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Health Tips, Home remedies, Skin care