मुंबई, 18 जानेवारी : मधुमेह हा अतिशय धोकादायक आजार आहे. यामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात 422 दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. यासोबतच दरवर्षी 15 लाख लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मधुमेहामुळे मृत्यू होतो. पण ही मोठी चिंतेची बाब आहे की, जगातील एकूण मधुमेही रुग्णांपैकी 17 टक्के रुग्ण हे भारतातील आहेत. भारतात सुमारे 80 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत.
आकडेवारीनुसार, 2045 पर्यंत भारतात 13.5 कोटी लोक मधुमेही असतील. यामुळेच भारताला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. दुसरीकडे, कोलेस्टेरॉल एक हट्टी चरबी म्हणजेच फॅट आहे, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. मधुमेह आणि कोलेस्टेरॉलचे एकत्र येणे शरीरासाठी घातक ठरू शकते. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर लगेचच ते दूर करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात करा. आम्ही काही सांगत आहोत, ज्याच्या मदतीने मधुमेह आणि खराब कोलेस्टेरॉलसोबतच दूर केले जाऊ शकते.
हा त्रास होऊ लागला की समजून जा, जीवघेण्या पातळीवर पोहचलीये ब्लड शुगर
मधुमेह आणि कोलेस्टेरॉलचा त्रास कमी कसा करायचा?
हेल्दी फॅटचे सेवन करा - हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लोक अनेकदा त्यांच्या आहारातून फॅट्स काढून टाकतात. मात्र हे चुकीचे आहे. हेल्दी फॅट घेणे आवश्यक असल्याचे एका संशोधनात म्हटले आहे. यासाठी एवोकॅडो, बदाम, बिया, मासे आणि ऑलिव्ह ऑईल खा. ते निरोगी चरबी प्रदान करतील, ज्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होईल आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढेल.
साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा - जर तुम्हाला मधुमेह असेल तर साखर अजिबात घेऊ नका. हे कोलेस्टेरॉल कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. आपल्या आहारातील साखर कमी करणे हे अनेक अर्थी फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल तर कमी होईलच, पण एकूणच आरोग्यही चांगले राहील.
अधिक भाज्या खा - निरोगी आयुष्यासाठी तज्ञ नेहमी हंगामी भाज्यांचा सल्ला देतात. त्यामुळे आहारात हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवा. पालक, फ्लॉवर, कोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची, बीन्स इत्यादींचा आहारात समावेश करा.
डायबिटीज असतानाही स्मोकिंग करता? हे गंभीर परिणाम तुम्हाला माहित हवेच
संपूर्ण धान्य - दररोज आपल्या आहारात संपूर्ण धान्य समाविष्ट करा. यापैकी भरड धान्य सर्वोत्तम असेल. पोषक तत्वांनी युक्त अन्न खा. अन्नामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवा आणि कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करा. नेहमी निरोगी अन्न खा. प्रक्रिया केलेले अन्न, तळलेले पदार्थ टाळा. पिझ्झा, बर्गर, चीज इत्यादीपासून अंतर ठेवा. सर्वात महत्वाचे म्हणजे पुरेसे पाणी प्या.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diabetes, Health, Health Tips, Lifestyle