S M L

चांदीचे दागिने काळे पडतायेत? हे उपाय करून पहा

चांदीचे दागिने सुंदर तर असतात परंतु ते लवकर काळे पडतात. चांदीच्या दागिन्यांची चमक परत आणण्यासाठी हे उपाय करुन पाहा.

Renuka Dhaybar | Updated On: May 1, 2018 07:21 PM IST

चांदीचे दागिने काळे पडतायेत? हे उपाय करून पहा

01 मे : सध्या बाजारात सोन्याच्या दागिन्यांपेक्षा कमी पैशात पण आकर्षक डिझाइन्समध्ये मिळाणाऱ्या चांदीच्या दागिन्यांचा जास्त मागणी आहे. चांदीचे दागिने सुंदर तर असतात परंतु ते लवकर काळे पडतात. चांदीच्या दागिन्यांची चमक परत आणण्यासाठी हे उपाय करुन पाहा.

1) चांदीच्या दागिन्यांना तांब्याच्या सजावटी वस्तूंसह गरम पाण्याने भरलेल्या एका भांड्यात ठेवा. पाण्यात मिठाचं प्रमाण जास्त ठेवा, अर्ध्या तासाने दागिन्यांना ब्रशने साफ करा आणि दुसऱ्या भांड्यातील गरम पाण्यात थोड्या वेळासाठी ठेवा. त्यानंतर सुक्या कपड्याने दागिन्यांना पुसून घ्या. तुमच्या दागिन्यांची चमक आधी सारखी परत येईल.

2) पाण्यात एक मोठा चमचा बेकिंग सोडा घालावा आणि त्यात दागिने थोडा वेळ ठेवा. थोड्या वेळात पाण्यातून दगिने बाहेर काढून ते साफ करा. तुमचे दागिने तुम्हाला पुन्हा चमकताना दिसतील.

3) बाजारात चांदीच्या दागिन्यांना चमक येण्यासाठी पॉलिश उपलब्ध आहे. चांगल्या कंपनीचं पॉलिश घ्या आणि दागिने साफ करा.

4) सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे टोमॅटो सॉसने सुद्धा चांदीचे दागिने साफ केले जाऊ शकतात. सॉसला दागिन्यावर लावून ब्रशने अलगत साफ करा. त्याने दागिने चमकतात.

Loading...
Loading...

5) लिंबू आणि हँड सॅनिटाइजरने देखील दागिने चमकवले जाऊ शकतात. लिंबू आणि हँड सॅनिटाइजर दागिन्यांवर घासून दागिन्याला लागलेली घाण साफ होते आणि दागिने चमकतात.

6) साफ केलेल्या दागिन्यांना सुकवून, दुसऱ्या दागिन्यांपासुन लांब कापासात गुंडाळून ठेवावे, याने दागिन्यांची चमक तशीच राहते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2018 07:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close