फूड पाॅयझनिंग झालंय? हे उपाय करून पहा

फूड पाॅयझनिंग झालंय? हे उपाय करून पहा

तुम्हाला उलटी, जुलाब,आंबट ढेकर आणि जळजळणं यासारख्या समस्यांना सामोरा जावं लागत असेल तर समजायचं तुम्हाला फूड पाॅयझनिंग झालंय.

  • Share this:

24 एप्रिल : तुम्हाला उलटी, जुलाब,आंबट ढेकर आणि जळजळणं यासारख्या समस्यांना सामोरा जावं लागत असेल तर समजायचं तुम्हाला फूड पाॅयझनिंग झालंय. अर्थात, यावर डाॅक्टरांचे उपाय जरुर करा. पण काही घरगुती उपायही आहेत.

1)  लसणामध्ये अॅंटिव्हायरल,अॅंटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे डायरिया आणि पोटदुखीपासून मुक्तता देतात. लसणाच्या पाकळ्या गरम पाण्यात उकळवून घ्या आणि तेच उकळलेले पाणी प्या.

2) पोटाच्या इन्फेक्शनच्या समस्या दूर करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरतो. 1 चमचा लिंबाचा रस चिमूटभर साखरेमध्ये मिक्स करावे. हे पाणी दिवसातून 2-3 वेळा प्यावे. असे केल्याने लगेच आराम मिळतो.

3) गॅस्ट्रिकच्या समस्यांपासून लगेचच आराम मिळवण्यासाठी सफरचंदाचे विनेगर हा उत्तम उपाय आहे. एक ग्लास कोमट पाण्यात सफरचंदाचे विनेगर घालून ते जेवणाआधी प्यावे. याने गॅस्ट्रिकच्या समस्या दूर होतील.

4) फूड पॉयझनिंगवर मुक्ती मिळवण्यासाठी तुळस ही उत्तम औषधी वनस्पती आहे. दोन ते तीन कप पाण्यामध्ये तुळशीची पानं उकळवून घ्या. या उकळलेल्या पाण्यात मध टाकून पिऊ शकता.

5) 1 ग्लास पाण्यात 1 टिस्पून जिरे उकळवून घ्या आणि त्यात मीठ घाला. हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या.

6) अपचनासाठी मध खूप फायदेशीर ठरते.

7) उलटी किंवा डायरियासारख्या समस्यांवर केळ्यांचे पदार्थ खावेत. तुम्ही त्यात वेलचीसुद्धा घालू शकता.

8) पोटासंबंधी समस्या असल्यास दह्यात मेथीचे दाणे मिक्स करून खावं.

9) ताज्या संत्र्याच्या ज्यूसमध्ये मिनरल्स, विटामिन्स आणि अन्य पोषक घटक असतात, जे रक्तदाबावर नियंत्रण ठेवतात. हा ज्युस प्यावा.

10) फूड पॉयझनिंगचे शिकार असाल तर हलक्या पदार्थांचे सेवन करावे. तिखट आणि दुधापासुन बनलेल्या पदार्थांचं सेवन करू नये.

First published: April 24, 2018, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading