• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Home Decor Tips: कमी बजेटमध्येही तुमचं घर करू शकता ड्रीम हाऊस; जाणून घ्या या काही टिप्स

Home Decor Tips: कमी बजेटमध्येही तुमचं घर करू शकता ड्रीम हाऊस; जाणून घ्या या काही टिप्स

एका सुंदर घराला बजेटची नसून सर्जनशीलतेची गरज असते. सुंदर घरासाठी मोठेच घर असणे आवश्यक नाही. तुम्ही तुमचे छोटे घरसुद्धा कमी बजेटमध्ये आकर्षक आणि सुंदर बनवू शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: आपलं एक सुंदर घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते. बरेच लोक त्यांच्या आयुष्यात स्वप्नातील घर साध्य करतात, परंतु काहीजण बजेटच्या अभावामुळे ते साध्य करू शकत नाहीत. परंतु, आपल्यासाठी हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे की, एका सुंदर घराला बजेटची नसून (Low Budget Home Decor Tips) सर्जनशीलतेची गरज असते. सुंदर घरासाठी मोठेच घर असणे आवश्यक नाही. तुम्ही तुमचे छोटे घरसुद्धा कमी बजेटमध्ये आकर्षक आणि सुंदर बनवू शकता. कमी बजेटमध्ये घर सर्जनशीलतेने अतिशय सुंदर बनवता येवू शकते, कसे ते जाणून घेऊया मेन गेटची सजावट विशेष असावी मुख्य द्वार (मेनगेट) हा तुमच्या घराचा चेहरा आहे. त्यामुळं मुख्य दाराजवळची सजावट चांगली ठेवली जाणं गरजेचे आहे. तुम्ही तुमचे मेनगेट सजवण्यासाठी फुले किंवा मातीची सजावट वापरू शकता. हँगिंग विंड चाइम आणि आकर्षक सजावट इथे छान दिसेल. तुम्ही येथे नेमप्लेटचा प्रयोगही करू शकता आणि घरात खाली सुंदर भांड्यांमध्ये झाडे लावू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. बेडरूमला बनवा खास जर तुमच्याकडे घर रंगविण्यासाठी बजेट नसेल तर संपूर्ण घर रंगवण्याऐवजी दिवाणखान्याची एक भिंत सुंदर रंगाने रंगवा. आपण येथे वॉल पेपरचा देखील उपयोग करू शकता. हे आपल्या घराचं रुपडंच बदलून टाकू शकतात. भिंतीची सजावट महागडी सजावट विकत घेण्याऐवजी तुम्ही घरी काही हस्तकला किंवा सजावट देखील करू शकता. आपण हे करू शकत नसल्यास कुटुंबाचा फोटो घरी फ्रेम करा. हे आपल्या भिंतीला नवीन रूप देईल. झुंबर नवीन लुक देते जर तुम्ही दिवाणखान्यात झूमर लावले तर ते घराचे स्वरूप शाही करेल. प्रत्येक कमी अधिक किंमतीमध्ये झूमर उपलब्ध आहेत. फॅन्सी लाइट्स किंवा हँडक्राफ्ट झूमर असतील तर अधिक आकर्षक दिसू शकते. हे वाचा - बायकोनं केलेला अपमान जिव्हारी लागला; पुण्यातील तरुणानं उचललं टोकाचं पाऊल सोफ्याचे स्वरूप बदला तुम्ही तुमच्या जुन्या सोफ्याला नवीन रूप देण्यासाठी कव्हर आणि कुशन बदलू शकता. गडद सोफ्याच्या कव्हरवर, आपण हलके किंवा चमकदार रंगाचे लहान किंवा मोठे कुशन ठेवावेत. अशा प्रकारे तुमच्या घराला एक नवीन आणि सुंदर लुक मिळेल.
  Published by:News18 Desk
  First published: