Home /News /lifestyle /

घराची साफसफाई करताय सावधान ! पालकांनो मुलांचं आरोग्य धोक्यात तर घालत नाहीत ना?

घराची साफसफाई करताय सावधान ! पालकांनो मुलांचं आरोग्य धोक्यात तर घालत नाहीत ना?

साफसफाई (home cleaning) करणं आरोग्यासाठी चांगलं असतं, त्यामुळे साफसफाई केल्यानं मुलांचं आरोग्य (Child health) धोक्यात येतं, हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल.

    ओटावा, 19 फेब्रुवारी : घरात लहान मुलं म्हटली की ती जमिनीवर फिरणार, खेळणार, जमिनीवर पडलेली किंवा हाताला लागेल ती वस्तू तोंडात घालणार आणि अशात जर घर स्वच्छ नसेल, तर मूल आजारी पडू शकतं. त्यामुळे आपलं मूल आजारी पडू नये याची काळजी पालक घेतात आणि आपलं संपूर्ण घर स्वच्छ ठेवतात. मुलाला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही करत असलेली ही साफसफाई तुमच्या मुलांना आजारी तर पाडत नाही ना? साफसफाईमुळे मूल आजारी पडतं असं, एका संशोधनात दिसून आलं आहे. आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या साफसफाईमुळे मुलांचं आरोग्य धोक्यात कसं काय येईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे वाचून तुम्हालाही थोडं आश्चर्य वाटलं असेल. साफसफाईमुळे लहान मुलांना अस्थमा (Asthama) होण्याचा धोका वाढतो, असं एका संशोधनात आढळून आलं आहे आणि याला कारणीभूत आहे, घराच्या साफसफाईसाठी वापरली जाणारी उत्पादनं आणि रसायनं. मुलांना होणारा अस्थमा आणि साफसफाईसाठी वापरली जाणारी उत्पादनं यांचा संबंध असल्याचं संशोधकांना अभ्यासात दिसून आलं. कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये (Canadian Medical Association Journal) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हेदेखील वाचा - बापरे ! मुलगी की झाडाचं खोड; दुर्गम भागातल्या चिमुरडीची विचित्र आजाराशी झुंज संशोधकांनी कॅनडातील 2000 नवजात बाळांवर अभ्यास केला. ज्या मुलांच्या घरात डिशवॉश डिटर्जेंट, कपड्यांचं डिटर्जेंट आणि जमीन स्वच्छ करणाऱ्या केमिकल्सचा जास्तीत जास्त वापर होतो, त्या मुलांना अस्थमा होण्याचा धोका 37 टक्क्यांपर्यंत वाढतो, अस या अभ्यासात दिसलं. संशोधकांनी सांगितलं की, साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक उत्पादनांच्या संपर्कात राहिल्याने मुलांच्या श्वासनलिकेल हानी पोहोचते. केमिकल श्वासनलिकेमार्फत मुलांच्या शरीरात पोहोचतात, त्यांच्या श्वसनप्रणालीत सूज येते आणि यामुळे मुलांना अस्थमा बळावू शकतो. घराबाहेर असलेल्या प्रदूषणानंतर आता घरातील प्रदूषणाबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हेदेखील वाचा - सावधान !  प्रेग्नन्सीमध्ये करू नका ‘ही’ चूक; नाहीतर बाळाला होऊ शकतं फ्रॅक्चर
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Asthma, Child care, Health

    पुढील बातम्या