• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • मुलांनी भिंती रंगवल्यानं आलं टेन्शन; या सोप्या टिप्स करतील तुमची मदत

मुलांनी भिंती रंगवल्यानं आलं टेन्शन; या सोप्या टिप्स करतील तुमची मदत

पक्के डाग झाले असतील तर साध्या टूथपेस्टच्या सहाय्याने जाऊ शकतात.

पक्के डाग झाले असतील तर साध्या टूथपेस्टच्या सहाय्याने जाऊ शकतात.

मुलांनी भिंती(Wall)रंगीबेरंगी चित्रांनी रंगवल्या असतील आणि त्यामुळे घर खराब दिसत असेल तर,या टिप्सच्या(Tips)सहाय्याने भिंत सहजपणे स्वच्छ करू शकता.

 • Share this:
  मुंबई, 29 जून: मुलांसाठी घराच्या भिंतींपेक्षा (Wall) चांगला कॅनव्हास कोणतात नसतो. आपली सगळी कला मुलांना भिंतींवर दाखवायची असते. चित्र काढण्यासाठी मुलांना वही दिली तरी, ते भिंतींवरच रेषा ओढत राहतात. त्यामुळे घरात लहान मुलं असतील तर, घराची निगा राखणं सोपं काम नाही. क्रेयॉन, वॉटर कलर्स, पेन्सिल भिंतीवरचे बरेच वेगवेगळे रंग साफ करताना आपले हात थकून जातात पण, असे हट्टी डाग(Stains)जात नाहीत. त्यामुळे भिंतीवरचे डाग काढण्यासाठी काही सोप्या टिप्स(Tips)करून पहा. बेकिंग सोडा 4 ते 5 चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यात पाणी घालून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट स्क्रबबरवर लावा आणि डाग पडलेल्या भागावर चोळा. थोड्यावेळात रंग निघून जाईल. (जास्त पगार की घरात मदत काय हवं? बायकोनेच ठरवावं आता काय हवं) टूथपेस्ट पक्के डाग झाले असतील तर, साध्या टूथपेस्टच्या सहाय्याने जाऊ शकतात. याकरता डाग पडलेल्या ठिकाणी पेस्ट लावा. काही तासांनंतर स्क्रबरच्या मदतीने घासून घ्या. डाग गायब होतील. मेयोनिज सॅलड किंवा सँडविचमध्ये वापरले जाणारं मेयोनिज डाग काढून टाकण्यासाठीही वापरता येऊ शकतं. आधी डाग पडलेल्या भिंतीवर मेयोनिज लावा आणि गोलाकार घासा. लगेचच डाग निघून जातील. (रोज खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे, कोलेस्ट्रॉल आणि वजनही होईल कमी) व्हिनेगरचा वापर रंगाचे डाग काढण्यासाठी व्हिनेगर देखील वापरता येतं. अर्धा ग्लास व्हिनेगर आणि टूथब्रश घ्या. ब्रशच्या सहाय्याने डागलेल्या भागावर व्हिनेगर लावा आणि हळूहळू चोळा. साबणाचं पाणी भिंती स्वच्छ करण्यासाठी, साबणाचं पाणी वापरा यामुळेही डाग हळूहळू निघून जातात. याचा वापर करून घराच्या सगळ्या भिंती स्वच्छ करू शकता.
  Published by:News18 Desk
  First published: