Home /News /lifestyle /

प्रसिद्ध अभिनेत्रीचं थक्क करणार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, 'या' एका गोष्टीच्या सहाय्याने घटवलं तब्बल 30 किलो वजन

प्रसिद्ध अभिनेत्रीचं थक्क करणार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, 'या' एका गोष्टीच्या सहाय्याने घटवलं तब्बल 30 किलो वजन

वाढतं वजन (Weight Gain) ही आपल्यापैकी अनेकांची डोकेदुखी आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण अनेक सल्ले देतात. डाएटबरोबरच चालणं हा वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे असं म्हटलं जातं. एका अभिनेत्रीनं हे खरं करून दाखवलं आहे.

     मुंबई, 24 मे-   वाढतं वजन (Weight Gain) ही आपल्यापैकी अनेकांची डोकेदुखी आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण अनेक सल्ले देतात. डाएटबरोबरच चालणं हा वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे असं म्हटलं जातं. एका अभिनेत्रीनं हे खरं करून दाखवलं आहे. ऑस्ट्रेलियन अभिनेत्री रेबेल विल्सननं (Rebela Wilson) ब्रिस्क वॉक करून 30 किलोपेक्षाही जास्त वजन कमी केलं आहे. याचबद्दल दैनिक भास्करच्या वेबसाईटवर वृत्त देण्यात आलं आहे. मॉडरेट वॉक (Moderate Walk) करून वजन कमी करणं शक्य होतं. पण त्याचबरोबर तुमच्या डाएटमध्येही बदल (Changes In Diet) करणं गरजेचं आहे. चालण्याबरोबरच हाय प्रोटीन डाएट (High Protein Diet) वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ऑस्ट्रेलियन स्टार रेबेल विल्सन ही तिच्या जाडीवरून अनेकदा टीकेचं लक्ष्य ठरली होती. मात्र तिनं जवळपास 65 पाउंड म्हणजेच 30 किलो वजन कमी केल्याचं 2021 मधील एका मुलाखतीत म्हटलं होतं. आता नुकत्याच म्हणजे मे 2022 मधील एका मुलाखतीत तिनं जवळपास 36 किलो वजन कमी केल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे यासाठी तिनं कोणतंही कडक डाएट किंवा अतिव्यायाम केलेला नाही, असंही तिनं स्पष्ट केलं. खूप वेगानं चालण्यापेक्षा रेबेलनं मॉडरेट वॉक करायला प्राधान्य दिलं. त्याचबरोबर तिनं भरपूर पोषणमूल्य असलेलं हायप्रोटीन डाएटही (High Protein Diet) घेतलं. कायम विनोदी भूमिका करत असलेल्या रेबेलनं आता गंभीर भूमिका करण्याची संधी मिळावी यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. आपल्याकडेही अभिनेत्री आणि मॉडेल मलाईका अरोरा (Malaika Arora) तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. तिच्या डक वॉकवर भरपूर टीकाही होते;पण तिच्या फिटनेसमध्ये चालण्याचा व्यायामही महत्त्वाचा आहे. वॉकिंगचे आणखी काय फायदे आहेत आणि कोणत्या प्रकारचा वॉक जास्त पायदेशीर ठरतो हे जाणून घेऊया. चांगल्या आरोग्यासाठी 150 मिनिटं चालणं चांगलं (150 mns Walk) असतं असं तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेतील ज्येष्ठांसाठी आठवड्यातून 150 मिनिटांची मॉडरेट- इंटेन्सिटी ॲरोबिक फिजिकल ॲक्टिव्हिटी (Moderate- Intensity Arobic Physical Activity) करण्याचा सल्ला सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं (Centre For Disease Control And Prevention) दिला आहे. किंवा 75 मिनिटांची हाय इंटेन्सिटी फिजिकल ॲक्टिव्हिटीही (High Intensity Physical Activity) करता येऊ शकता, असंही सेंटरनं म्हटलं आहे. तर लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी 60 मिनिटांच्या व्यायामाचा सल्ला देण्यात आला आहे. वॉकिंग म्हणजेच चालणं हा फिजिकल ॲक्टिव्हिटी अर्थात व्यायामाचा सर्वोत्तम प्रकार सांगण्यात आला आहे. सर्वसाधारण वेगाने चालणं म्हणजे मॉडरेट वॉक आणि अति वेगानं केलेला वॉक जो रनिंग अर्थात धावण्यात रूपांतरित होतो म्हणजे हाय इंटेन्सिटी वॉक अशी व्याख्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेव्हिअरल अँड फिजिकल ॲक्टिव्हीटीनं (International Journal Of Behavioral and Physical Activity) केली आहे. साधारणपणे 21 ते 40 वर्ष वयोगटांतील तरुण-तरुणींसाठी मॉडरेट वॉक म्हणजे एका मिनिटांत 100 स्टेप्स चालण्याचं टारगेट ठेवणं. तर हाय इंटेन्सिटी वॉक (High Intensity Walk) म्हणजे एका मिनिटांत 130 स्टेप्स् आणि त्यापेक्षा जास्त वेगाने म्हणजे एका मिनिटांत 10 स्टेप्स चालणं. याचस्थितीला रनिंग म्हणतात. हा वेग म्हणजेच वॉकिंग हे रनिंगमध्ये बदललं जातं. चालण्याचे अनेक फायदे आहेत. महत्वाचं म्हणजे हा अगदी सहज सोपा, कोणालाही जमेल असा व्यायाम आहे. त्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. लठ्ठपणा, वजन कमी करण्याबरोबरच चालण्याचे अन्य बरेच फायदे आहेत. ज्या महिलांच्या कंबरेचा घेर 35 इंच आणि पुरुषांची 40 इंच असते, त्यांना ॲब्डोमिनल ओबेसिटीची (Abdominal Obessity) समस्या असते. ही आरोग्यासाठी धोकादायक स्थिती मानली जाते. चालणं हा पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्याचा उत्तम मार्ग मानला जातो. 30 मिनिटं ब्रिस्क वॉक केल्यास 200 कॅलरीज बर्न होतात. एक ते दीड तास दररोज चालल्यास तुमची कंबर कायम सडपातळच राहील आणि वजनही कमी होईल. वजन कमी झाल्यामुळे ब्लड प्रेशरचा धोकाही कमी होतो. एक ते दीड तास वॉक केल्यानं तुमच्या कंबरेवर जमा झालेली चरबी कमी होते आणि कंबर सडपातळ होते, असं जर्नल ऑफ एक्सरसाईज न्यूट्रीशन अँड बायोकेमिस्ट्रीच्या (Journal Of Exercise Nutrition And Biochemistry) एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एका अभ्यासातंर्गत काही महिलांकडून 50 ते 70 मिनिटे वॉक करण्याचा व्यायाम करून घेतला. आठवड्यातून कमीतकमी 3 वेळा हा व्यायाम करायला त्यांना सांगण्यात आलं. हे रुटीन 12 आठवड्यांपर्यंत कायम ठेवलं. त्यानंतर वजन करणाऱ्या महिलांची कंबर अन्य महिलांच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी झाल्याचं निदर्शनास आलं. चालण्यामुळे गुडघ्यावर ताण पडतो असे अनेक गैरसमज चालण्याच्या व्यायामाबाबत अनेकांच्या मनात आहेत. पण हे चुकीचं आहे, असं फोर्टिस मेमोरियल रिसर्च सेंटरच्या डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड जॉईंट रिप्लेसमेंट विभागाचे संचालक डॉ. जयंत अरोरा यांनी स्पष्ट केलं. उलट चालण्याचा व्यायाम नियमित केल्यानं गुडघ्याशी संबंधित त्रास कमी होतात. वॉक केल्यानं गुडघ्यांचं आयुष्य कमी होण्याऐवजी वाढतं, असंही त्यांनी सांगितलं. आठवड्यातून 7 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ चालणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 14 % कमी असतो, असं अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या एका अभ्यासातून पुढे आलं आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह,ब्लडप्रेशर याबरोबर अगदी लैंगिक समस्या ते महिलांमध्ये गर्भधारणेपर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्या महिलांचा BMI 20 ते 24 च्या दरम्यान आहे, त्यांच्यामध्ये सर्वसामान्य महिलांपेक्षा इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वाची समस्या जास्त दिसून आली. अमेरिकेत जवळपास 25% ओव्युलेट्री इन्फर्टिलिटीमागील कारण लठ्ठपणा असल्याचं सांगितलं जातं. त्याशिवाय लठ्ठपणामुळे कोरोनरी हार्ट डिसिजचा धोकाही 81 % अधिक असतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये डिप्रेशनचा धोकाही 55% अधिक वाढतो. चालण्याचा व्यायाम करून हे सगळं आपण टाळू शकतो. फक्त योग्य स्थितीत चालणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे चालताना शरीर ताठ असलं पाहिजे आणि खाली बघून चालू नये तर सरळ बघून चालावं असा सल्ला डॉ. जयंत अरोरा देतात. खरं तर चालणं हा सर्वांगसुंदर आणि अगदी सोपा व्यायाम आहे. ज्यामुळे आपलं फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही उत्तम राहू शकतं. तेव्हा वाट कसली बघताय? चला चालायला…
    First published:

    पुढील बातम्या