मुंबई, 16 मार्च: आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण-समारंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक सण आपल्याकडे मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. जानेवारी महिन्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) सणापासून (Festival) सण-समारंभांची सुरुवात होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच फाल्गुन पौर्णिमेला होलिका (होळी) दहन (Holika Dahan) केलं जातं.
होळीच्या दिवशी घराच्या समोर होलिकादहन केलं जातं. हे दहन करताना शुभमुहूर्ताला (Shubh Muhurat) फार महत्त्व आहे. असं मानलं जातं, की हिरण्यकश्यपूनं (Hiranyakashyapu) भगवान विष्णूचा (Lord Vishnu) भक्त असलेल्या बाळ प्रल्हादला (Pralhad) होलिकेच्या मांडीवर बसवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान होलिकेचा स्वतःच्याच आगीत जळून मृत्यू झाला होता. तेव्हापासून दर वर्षी फाल्गुन पौर्णिमेला (Falgun Pournima) होलिकादहन केलं जातं. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. या वर्षी होलिकादहन 17 मार्च 2022 रोजी होणार असून, त्यानंतर 18 मार्च 2022 रोजी धूलिवंदन खेळलं जाणार आहे. होलिकादहनाची (Holi 2022) पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नाही तर जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावं लागू शकतं. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
होळी पेटवताना खालील चुका टाळाव्यात
- होळी पेटवताना आंबा, पिंपळ आणि वडाचं लाकूड वापरू नये. या वृक्षांची लाकडं जाळल्यानं नकारात्मकता येते. त्याऐवजी होळीमध्ये उंबर आणि एरंडीचं लाकूड वापरावं. होळीच्या दिवशी या दोन्ही वृक्षांची लाकडं जाळणं शुभ मानलं जातं.
सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं हाडांसाठीही असं ठरतं घातक; वेळीच बदला सवय
- होळीच्या दिवशी न विसरता आपल्या आईचा (Mother blessing on Holi) आशीर्वाद घेतला पाहिजे. सोबतच आईला एखादी भेटवस्तूही देणंही चांगलं मानलं जातं. असं केल्यास तुमच्यावर भगवान श्रीकृष्णाची कृपा होते. होळीच्या दिवशी चुकूनही एखाद्या स्त्रीचा अपमान करू नये.
- होळीतल्या आगीला (Fire of Holi) जळत्या शरीराचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं नवविवाहित महिलांनी (Newly Wed Woman) ही आग पाहू नये, असं म्हणतात. एखाद्या नवविवाहितेने होळीची आग पाहणं अत्यंत अशुभ (Inauspicious) मानलं जातं. अशा महिलेनं होळीची आग पाहिल्यास तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात.
- तुम्ही आई-वडिलांचं एकुलतं एक अपत्य (Single Child) असाल तर होळी पेटवू नका. एकुलत्या एक अपत्यानं होळी पेटवणं अशुभ मानलं जातं. तुम्हाला भावंडं असतील तर तुम्ही होळी पटवू शकता.
करोडपती बनणाऱ्यांच्या अशा असतात हस्तरेखा; तुमच्या हाताच्या कशा आहेत?
- होळीच्या दिवशी कुणालाही काही उसनं देऊ नये, असं म्हणतात. तसं केल्यास घरातली भरभराट जाते आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे होळीच्या दिवशी कोणालाही उसनं किंवा कर्ज देण्याचं टाळावं.
होळीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या वर्षी होळीची पूजा करताना वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमची भरभराट होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Culture and tradition, होळी