Home /News /lifestyle /

10 सेकंद श्वास रोखता येणं म्हणजे मला खरंच कोरोना संसर्ग नाही का?

10 सेकंद श्वास रोखता येणं म्हणजे मला खरंच कोरोना संसर्ग नाही का?

श्वासावरून कोरोना निदान (Coronavirus breathing test) करण्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 08 मे : कोरोनाच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवल्याने प्रत्येक जण घाबरलेला आहे. त्यात आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. जो तो आपल्याला कोरोना होऊ नये याची काळजी घेत आहे. अशातच सोशल मीडियावर (social media) कोरोनासंबंधी अनेक मेसेज (message about Coronavirus) येत आहेत. लोक त्यावर विश्वास ठेवून त्याचं अनुकरण करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे श्वास रोखून ऑक्सिजनची पातळी चेक करणं आणि कोरोनाचं निदान करणं (hold breath to check Coronavirus). 10 सेकंद श्वास रोखून धरा. जर तुम्हाला असं करता आलं तर तुम्ही कोरोनामुक्त आहात. अशा आशयाचा मेसेज तुम्हालाही आला असेल.तर या मेसेजमध्ये किती तथ्य आहे? खरंच असं होतं का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याचं उत्तर आहे, नाही. Pib fact check ने या व्हायरल होणार्‍या मेसेजबाबत ट्विट केलं आहे. या मेसेजमध्ये काहीही तथ्य नाही असं सांगण्यात आलं आहे. हा दावा खोटा असल्याचं पीआयबीने म्हटलं आहे. 10 सेकंद श्वास रोखून ऑक्सिजन पातळी चेक करून तुम्ही कोरोनाचं निदान नाही करू शकत. कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर किंवा अँटिजेन चाचणीच योग्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे वाचा : कोरोनातून लवकर बरं व्हायचं आहे; आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश आरटीपीआर टेस्टमध्ये नाक किंवा घशातील Swab नमुने घेतले जातात. सरसकट सर्वांनी ही टेस्ट करायला हवी असंही नाही. नुकत्याच  इंडियन काऊन्सिल ऑफ  मेडिकल रिसर्चने ( Indian Council of Medical Research) याबाबत नव्यागाइड लाइन जारी केल्या आहेत. ICMR ने रॅपिड अँटिजेन टेस्टवर (Rapid Antigen Testing) भर देण्यास सांगितलं आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आहेत आणि त्यांची RAT टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांची RT-PCR टेस्ट करावी. जर अँटिजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही. हे वाचा : पुण्यात रुग्णसंख्या कमी तरी धोका कायम! पुणेकरांनो या 7 गोष्टीच करतील तुमचा बचाव आरटी-पीसीआर टेस्ट एकदा पॉझिटिव्ह आली तर पुन्हा करण्याची गरज नाही. होम आयसोलेशनचे दहा दिवस पूर्ण झाले असतील आणि त्यातील शेवटचे तीन दिवस ताप नसेल तर आरटी-पीसीआर टेस्ट करू नये. कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर डिस्चार्ज देताना पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही. आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तीची आरटी-पीसीआर टेस्ट नको, असं आयसीएमआरने म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Health

    पुढील बातम्या