• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • काय सांगता! महासाथ रोखण्यासाठीच झाली होती चाटची निर्मिती! 12 व्या शतकातही होता दहीवडा

काय सांगता! महासाथ रोखण्यासाठीच झाली होती चाटची निर्मिती! 12 व्या शतकातही होता दहीवडा

12 व्या शतकात दहीवडा होता. एवढंच काय इसवी सन 500 पूर्वीही दही वड्याबाबत लिहिलं गेलंय.

  • Share this:
मुंबई, 26 जून: चाट म्हटलं की तोंडाला पाणी सुटणार नाही असा माणूस निराळाच. एकदा या चाटची चटक लागली, की त्यातून सुटका केवळ अशक्य! मग सारखं काही ना काही कारण काढून बाहेर जाणं, आणि मग रगडा चाट किंवा समोसा चाट वर ताव मारणं हा नित्यक्रमच होऊन बसतो. विशेष म्हणजे चाट खाण्यासाठी कोणतेही विषेश कारण लागत नाही. अगदी दुसऱ्या एखाद्या कामासाठी बाहेर गेलं, तरी घरी येता येता आपण एखादी प्लेट चाट खाऊन येतो. असं हे सगळ्यांचं आवडतं स्ट्रीट फूड भारतीयांच्या आयुष्यात आलं कुठून..? कित्येक लोकांचं असं मत आहे, (Indian Chaat History) की, एका कॉलरा महामारीच्या उपचारांसाठी चाट खायला सुरुवात करण्यात आली होती. मग या स्ट्रीट फूड असणाऱ्या चाटमध्ये खरंच काही गुणधर्म आहेत का? याबाबत झी न्यूजने वृत्त दिलंय. चाटच्या शोध (Who Invented Golgappa) कोणी लावला याबद्दल अनेक कथा आहेत. त्यापैकी एक आहे ती मुघल सम्राट शाहजहां (Shah Jahan) यांच्या दरबारातील कथा. खाद्य तज्ज्ञ कृष दलाल यांच्या म्हणण्यानुसार चाटचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. 16व्या शतकात शाहजहांच्या राजवटीत कॉलरा नावाचा आजार (Cholera Pandemic) पसरला होता. बरेच प्रयत्न करूनही कोणताही वैद्य किंवा हाकीम त्यावर नियंत्रण आणू शकले नाही. त्यामुळे कॉलरा (Cholera Pandemic) आजार रोखण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधली गेली. त्यानुसार, एक असा पदार्थ बनवण्यास सांगण्यात आलं ज्यामध्ये विविध प्रकारचे मसाले असतील. जेणेकरून ते खाल्ल्यानंतर पोटातील जिवाणूंचा (Bacteria) खात्मा होईल. यासाठी जो पदार्थ तयार करण्यात आला तो म्हणजे मसाला चाट (Chaat History). असं म्हणतात की त्या मसाला चाटला पूर्ण दिल्लीतील लोकांनी खाल्लं होतं. Ease Of Living Index: भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कुठलं? पाहा मुंबई कुठे? त्यावेळी दरबारचे चिकित्सक राहिलेले हकीम अली यांच्या म्हणण्यानुसार, दुषित पाण्यामुळे लोकांना पोटाचे आजार होत होते. यानंतर, त्यांच्या सल्ल्यानुसार, चिंच, लाल मिरची, धणे आणि पुदीना यासारख्या मसाल्यांनी एक खास डिश (मसालेदार चाट) तयार केली गेली. या कथेच्या सत्यतेचा कोणताही पुरावा नाही. परंतु आज उत्तर प्रदेशातून तयार झालेली चाट दक्षिण आशियापर्यंत प्रसिद्ध झाली आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणात चाटप्रेमी आहेत. International Yoga Day: साक्षात माधुरी दीक्षितबरोबर करा दररोज योगा; पाहा VIDEO काही इतिहासकार (Historians) चाट ला दही भल्‍ल्याशी (Dahi Bhalle History) जोडतात. 12व्या शतकात संस्‍कृतच्या इनसायक्‍लोपीडिया (Encyclopedia) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसओलसामध्ये दही वड्याचा उल्लेख आहे. हे पुस्तक सोमेश्‍वरा तृतीय यांनी लिहिलं होतं. फूड हिस्‍टोरियन (Food Historian) केटी आचाया यांच्यामते, इसवी सन 500 पूर्वीही दही वड्याबाबत लिहिलं गेलंय. मानसओलसा मध्ये वडा दूध, तांदळाचे पाणी किंवा दहीत बुडवण्याचा उल्लेख आहे. कोरोनामुळे बाहेरचे पदार्थ खाण्यावर बंधनं आली आहेत. मात्र, चाटचा हा इतिहास वाचून तरी चाट आजार रोखण्यासाठी बनवली गेली हे नक्की.
First published: