मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /भारतालं जावयाचं गाव! इथं लग्नानंतर नवरी नाही तर नवरा जातो सासरी कारण...

भारतालं जावयाचं गाव! इथं लग्नानंतर नवरी नाही तर नवरा जातो सासरी कारण...

या गावात नवरीऐवजी नवरा नांदतो सासरी.

या गावात नवरीऐवजी नवरा नांदतो सासरी.

या गावातील एकही मुलगी लग्नानंतर सासरी नांदायला जात नाही. तर ती नवऱ्यासोबत माहेरीच राहते.

    लखनऊ, 08 ऑगस्ट : सामान्यपणे लग्नानंतर (Marriage) मुलगी माहेर सोडून सासरच्या घरी (In laws home) नांदायला जाते अशी भारतात पद्धत आहे. घरजावई (Son in laws) होणं हे अनेकांना रुचत नाही. पण याच भारतात एक असं गाव आहे, जिथं लग्नानंतर नवरी (Bride) नाही तर नवरा सासरी जातो. मुली (Bride do not go in laws home) नाही तर मुलांना सासरी घरजावई म्हणून राहावं लागतं. त्यांना घरजावई (Groom) म्हणून राहावं लागतं.

    उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कौशांबी हिंगुलपूर गाव. या गावातील मुलीसोबत लग्न केल्यानंतर नवरदेवाला (Groom live at in laws home) घरजावई (Husband live at in laws home) म्हणून राहावं लागतं अशी या गावची पद्धत आहे. आता हे गाव घरजावयांचं गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. घरजावई म्हणून येणाऱ्या मुलाला त्याच्या सासरची मंडळीच नोकरी (Job) किंवा एखादा व्यवसाय (business) करण्यासाठी मदत (Help) करतात.

    हे वाचा - काहीही! लेकीच्या ब्रेस्टवर थुंकून आशीर्वाद देतात वडील; लग्नातील विचित्र प्रथा

    हिंगुलपूर या गावात एकेकाळी स्त्री भ्रूण हत्या (Female feticide) आणि हुंडाबळीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. पण आता येथील परिस्थिती बदलली आहे. हे प्रकार कमी व्हावेत, यासाठी गावाने लग्नाची नवीन पद्धत स्वीकारली आहे. गावातील मुलीचं लग्न झालं तर तिला सासरी न पाठवता तिच्या नवऱ्यासह मुलीच्या माहेरीच ठेवण्याचा निर्णय गावातील ज्येष्ठ नागरिकांनी (Senior citizen) काही वर्षांपूर्वी घेतला. यामागे त्यांचा उद्देश होता की आपल्या गावातील मुलीला चांगलं जीवन मिळावं. तिच्यावर अत्याचार होऊ नयेत.

    या गावातील मुलीसोबत लग्न केल्यानंतर घरजावई म्हणून राहावं लागेल, ही महत्त्वाची अटच (Important condition) बनली आहे. या अटीमुळे मुलगी अविवाहित (Unmarried) राहिली आणि नंतर तिला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू नये, हे टाळण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर विशेष भर दिला जाऊ लागला. अभ्यासासोबतच येथील मुलींना शिवणकाम आणि विणकाम यासारखे काही कौशल्यावर आधारित शिक्षण दिलं जातं. जेणेकरून नोकरी मिळाली नाही तर त्या एखादा व्यवसाय करतील आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही.

    हे वाचा - मुलाच्या 16 वर्षीय मित्राच्या प्रेमात पडली 7 मुलांची आई; लग्न केल्यानंतर...

    हिंगुलपूरसारखंच मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्याच्याजवळ बितली गावालाही जावयांचं गाव म्हणून ओळखतात. बितलीमधल्या मुलीशी लग्न करणाऱ्या नवऱ्या मुलाला आपल्या पत्नीच्या घरी घरजावई म्हणून राहावं लागतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची घरजावई व्हायची तयारी असेल तर तो या गावातील मुलींचा स्थळ म्हणून विचार करू शकतो.

    First published:
    top videos

      Tags: Bridegroom, Marriage, Uttar pradesh, Wedding, Wife and husband