मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपात आजन्म कारावास; जेलमधूनच कैदी कमवतोय वर्षाला 8 लाख

गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपात आजन्म कारावास; जेलमधूनच कैदी कमवतोय वर्षाला 8 लाख

तुरुंगात राहून हा कैदी इतकं करतो तरी काय की तो इतके पैसे कमवतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

तुरुंगात राहून हा कैदी इतकं करतो तरी काय की तो इतके पैसे कमवतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

तुरुंगात राहून हा कैदी इतकं करतो तरी काय की तो इतके पैसे कमवतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

    शिमला, 27 ऑक्टोबर : एखाद्या व्यक्तीवर एखादा कलंक लागला की तो मिटवणं अशक्य आहे, असं म्हणतात. शिवाय काही करण्याची इच्छा असेल तर अशक्यही शक्य करता येतंच. हेच दाखवून दिलं आहे ते हिमाचल प्रदेशमधील एका कैद्याने. काही वर्षांपूर्वी गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपात त्याला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. शिमलाच्या जेलमध्ये तो कैद आहे. मात्र तुम्हाला विश्वास बसणार नाही, तिथूनच तो वर्षाला तब्बल 8 लाख रुपये कमवतो आहे. शिमलाच्या जेलमधील या कैद्याने आपली शिक्षा, आपल्यातील कलेचा वापर केला आणि सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्याने सॉफ्टवेअर तयार केले आणि आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल बनवतो आहे. यामुळे तो वर्षाला 10 ते 12 लाख रुपये कमवतो. हा कैदी एकेकाळी एक हुशार विद्यार्थी होता. एका नामांकित नॅशनल टेक्निकल इन्स्टिट्युटमध्येही तो शिक्षण घेत होता. मात्र 2010 साली आपल्या प्रेयसीसह आत्महत्या करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावेळी प्रेयसीचा मृत्यू झाला पण त्याचा जीव वाचला. त्यानंतर त्याला गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली. कोर्टाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.  हे वाचा - इंटरनॅशनल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 4 परदेशी तरुणी सापडल्यानंतर बिंग फुटलं शिमलाच्या जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं. पण तिथं तो कुणाशीच बोलायचा नाही. शांत शांतच राहायचा. डीजी सोमेश गोयल यांना त्याच्यामध्ये काहीतरी विशेष असल्याचं जाणवलंं. डीजी सोमेश गोयल यांनी सांगितलं, "या कैद्याला जेलमध्ये पीठ मळण्याचं काम दिलं जायचं. कधी लंगर तर कधी जेलमधील बेकरीत तो काम करायचा. त्यानंतर त्याला नेमकं काय करायचं आहे, हे विचारलं तेव्हा त्याने आपल्याला सॉफ्टवेअर बनवता येतात आणि त्याच क्षेत्रात काहीतरी करायचं असल्याचं सांगितलं.  या कैद्याला एक लॅपटॉप देण्यात आला. त्याने सर्वात आधी जेल विभागात भरतीसाठी एक सॉफ्टेवेअर तयार केलं. त्यानंतर जेल व्हिजिटर मॅनेजमेंट आणि जेलमधील रिपोर्टसंबंधी सॉफ्टवेअरही तयार केले. त्याच्या या टॅलेंटमुळे जेलमधील या कामांवर खर्च होणारा 70 टक्के पैसा वाचू लागला" हे वाचा - वा रे पठ्ठ्या! Youtube वर व्हिडिओ पाहून ATM मशीन फोडत होता उच्चशिक्षित तरुण! याचदरम्यान एका प्रसिद्ध कोचिंग संस्थेनं आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी या कैद्याची निवड केली. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचं महत्त्वं वाढलं. असंच ऑनलाईन शिकवण्यासाठी एका कोचिंग संस्थेने त्याला वर्षाला 8 लाख रुपयांचं पॅकेज दिलं. आता हा कैदी विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवतो. सोमेश गोयल यांनी सांगितलं, "हा कैदी खूप मेहनती आहे. त्याच्यात इतकी क्षमता आहे, की यापेक्षाही जास्त पॅकेज त्याला लवकरच मिळेल. शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारे आपलं योगदान देणं हे खूप अभिमानास्पद आहे. शिवाय तो विद्यार्थ्यांचाही आवडता शिक्षक आहे. या कैद्याने ज्या मुलांना शिकवलं ती मुलं आज आपाआपल्या क्षेत्रात चांगलं काम करत आहेत. प्रसिद्ध संस्थांमध्ये शिकत आहेत. कैद्याने पुनर्वसनाबाबत एक मोठा आदर्श निर्माण केला आहे"
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या