मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Inspiration: 3 कोटींचं घर तरी, रस्त्यावर विकते जेवण; का घेतला उर्वशीने हा निर्णय?

Inspiration: 3 कोटींचं घर तरी, रस्त्यावर विकते जेवण; का घेतला उर्वशीने हा निर्णय?

याआधी उर्वशी एअरकंडिशनर गाडीतून फिरायच्या.

याआधी उर्वशी एअरकंडिशनर गाडीतून फिरायच्या.

संकट काळात पतीला साथ देण्यासाठी त्यांनी आपला ऐषोआराम सोडून उर्वशी यादव (Urvishi Yadav) यांनी रस्त्यावर छोले आणि कुलचे (Chole Kulche seller)विकायला सुरुवात केली.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 8 जून : संकट एखाद्या वादळाप्रमाणे असतात. वेगाने वाहणारा वारा जसं छप्परही उडवून नेऊ शकतो. तस संकटही होत्याचं नव्हतं करतात. मात्र संकट काळातही ताठ उभा राहणारा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचतो. याचं उदाहरण आहे उर्वशी यादव (Urvishi Yadav). उर्वशी यादव गुडगावमध्ये 3 कोटींच्या घरात राहणाऱ्या उच्चशिक्षित (Highly Educated), सुसंस्कृत महिला आहेत. मात्र पतीवर आलेल्या संकट काळात त्यांना साथ देण्यासाठी त्यांनी आपला ऐषोआराम सोडून रस्त्यावर छोले आणि कुलचे (Chole Kulche seller)विकायला सुरुवात केली आहे.

उर्वशी एका सुसंस्कृत घरामधल्या असल्यामुळे त्यांच्या निर्णयाला कुटुंबीयांनी प्रचंड विरोध केला. मात्र, तरीदेखील त्या विरोधाला न जुमानता त्यांनी एका झाडाखाली छोले आणि कुलचेचं दुकान लावायला सुरुवात केली. याआधी उर्वशी एअरकंडिशनर गाडीतून फिरायच्या. त्यांचे सासरे भारतीय वायुसेनेमध्ये निवृत्त विंग कमांडर आहेत. पती एका चांगल्या कंपनीत सीईओ पदावर होते.

(OMG! तरुणाने 180 डिग्रीमध्ये फिरवली स्वतःची मान आणि...; VIDEO पाहून बसेल शॉक)

मात्र अचानक सगळं बदललं पती अमित यादव यांचा मे महिन्यामध्ये अपघात झाला त्यानंतर डॉक्टरांनी हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. एका प्रसिद्ध कंपनीमध्ये सीईओ म्हणून काम करणाऱ्या पतीवर हिप रिप्लेसमेंट सर्जरी होणार असल्यामुळे भविष्यात ते काम करू शकतील की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

त्यावेळी सुरुवातीला त्यांनी नर्सरीमध्ये शिकवण्याचा निर्णय घेतला मात्र, तिथे मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात मुलांचं शिक्षण होणं अशक्य होतं. त्यामुळे आपली जेवणातली आवड त्यांनी व्यवसायात (Business) रूपांतरीत करण्याचा निर्णय घेतला. उर्वशी यांना घराची आर्थिक घडी बसवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि पतीला आधार देण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावं लागलं. त्यांनी एका झाडाखाली दुकान सुरू केलं.

(लशीआधी लहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; जगभरातील संशोधनाने कमी केली चिंता)

सुरुवातीला हे दुकान चालणार नाही असा त्यांच्या कुटुंबीयांना विश्वास होता. मात्र, उर्वशी यांचा चांगला स्वभाव आणि त्यांच्या हाताची चव पाहून लोक जेवणासाठी परत यायला लागले आणि त्यांचा हा बिजनेस जोरात सुरू झाला. महिलेने एखादा निर्णय घेतला तर, त्याला पूर्णत्वास नेण्यात ती कधीच मागे पुढे पाहत नाही याचं खरं उदाहरण उर्वशी आहेत. कुटुंबावर संकट आल्यानंतर संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्या समर्थपणे उभ्या राहिल्या. भरपूर पैसे आणि आरामाचं आयुष्य 3 कोटी किमतीचं घर स्कॉर्पिओ आणि क्रेटा सारख्या गाड्यांची मालकीण आज रस्त्यावर छोले कुलचे विकते आहे. मात्र या निर्णयाचा उर्वशी यांना किंचितही पश्चात्ताप नाही.

First published:

Tags: Inspiration, Inspiring story, Success stories, Success story