मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /थंडीच्या दिवसात Heart Attack चा धोका अधिक; व्यायाम करताना या गोष्टींची खबरदारी घ्या

थंडीच्या दिवसात Heart Attack चा धोका अधिक; व्यायाम करताना या गोष्टींची खबरदारी घ्या

Higher risk of heart attack in winter : हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) म्हणजे जलद गतीने केलेला व्यायाम हृदयावर अधिक दबाव टाकतो. त्यामुळे स्नायूंना अधिक ऑक्सिजनची गरज असते. या अतिरिक्त ऑक्सिजनसाठी शरीरावर अधिक ताण येतो, ज्यामुळे हृदय आणि श्वसन प्रणालीवर अधिक दबाव पडतो.

Higher risk of heart attack in winter : हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) म्हणजे जलद गतीने केलेला व्यायाम हृदयावर अधिक दबाव टाकतो. त्यामुळे स्नायूंना अधिक ऑक्सिजनची गरज असते. या अतिरिक्त ऑक्सिजनसाठी शरीरावर अधिक ताण येतो, ज्यामुळे हृदय आणि श्वसन प्रणालीवर अधिक दबाव पडतो.

Higher risk of heart attack in winter : हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) म्हणजे जलद गतीने केलेला व्यायाम हृदयावर अधिक दबाव टाकतो. त्यामुळे स्नायूंना अधिक ऑक्सिजनची गरज असते. या अतिरिक्त ऑक्सिजनसाठी शरीरावर अधिक ताण येतो, ज्यामुळे हृदय आणि श्वसन प्रणालीवर अधिक दबाव पडतो.

पुढे वाचा ...

मुंबई, 25 डिसेंबर:  प्रत्येक ऋतूमध्ये व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी हिवाळ्यात त्याबाबत काही विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांना हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास आहे किंवा ज्यांचा कौटुंबिक इतिहास हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित आहे, त्यांनी व्यायाम करताना अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे (Higher risk of heart attack in winter ) म्हणणे आहे.

दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत चतुर्वेदी यांनी सांगितले आहे की, थंड आणि कोरड्या हवेत श्वास घेतल्याने श्वासनलिकेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. त्याच वेळी हृदयाला अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे सामान्य दिवसांपेक्षा हृदयावर जास्त दबाव असतो. हिवाळ्यात कमी दिवस असल्याने कॉर्टिसोलसारख्या हार्मोन्सचे संतुलनही बिघडते.

कोर्टिसोल हार्मोन मुख्यत्वे तणाव नियंत्रित करतो. पण जेव्हा त्याची पातळी जास्त होते तेव्हा रक्तदाब वाढतो. त्यामुळेच हिवाळ्यात व्यायाम करण्यापूर्वी वॉर्म-अप केल्यास हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो, असे अनेक अभ्यास सांगतात.

वॉर्म अप आवश्यक

हिवाळ्यात कमी तापमानामुळे रक्तवाहिन्या (arteries) कडक होतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमजोर होतो. व्यायामादरम्यान वॉर्म अप केल्याने रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे हृदयावरील दाब कमी होतो. याशिवाय गरम झालेले स्नायू वेगाने ताणले जातात, तेथे ते अधिक लवकर नॉर्मल स्थितीत येतात. यामुळे त्यांना दुखापत होण्याचा धोकाही कमी होतो. म्हणून, व्यायाम करण्यापूर्वी नेहमी पाच ते 10 मिनिटे वॉर्म अप करावा.

कोणते स्ट्रेचिंग करायचे

हिवाळ्यात वॉर्म-अप कधीही स्टॅटिक स्ट्रेचने सुरू करू नये. हे असे स्ट्रेचेस आहेत ज्यामध्ये तुम्ही एकाच स्थितीत राहता. जसे जमिनीवर पाय ताणून बसणे आणि कोणताही एक पाय धरून शरीरावर ताण देणे. थंड पडलेल्या स्नायूंवर ताण टाकल्याने दुखापतीचा धोका वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात डायनॅमिक स्ट्रेचिंग (dynamic stretching) करावे. ही अशी क्रिया आहे, ज्यामध्ये सतत हालचाल होत असते, जसे की हात पसरवणे आणि त्यांना फिरवणे.

हे वाचा - Kitchen Tips: मळलेलं पीठ जास्त काळ राहील एकदम मऊसूत; या सोप्या ट्रिक्स वापरून पहा

पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या

निर्जलीकरण फक्त उन्हाळ्यातच होत नाही. मेयो क्लिनिकच्या मते, थंड हवा उबदार हवेपेक्षा कोरडी असते. व्यायामादरम्यान घाम येणे, थंडीमुळे जास्त लघवीमुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. याशिवाय पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. पेशींमध्ये पोषक द्रव्ये पोहोचवून शरीरातील द्रव संतुलित करते.

हे वाचा - LPG Cylinder मुळे अपघात झाल्यास मिळेल 50 लाखांची नुकसान भरपाई, वाचा कशाप्रकारे कराल क्लेम

उच्च तीव्रतेचा व्यायाम टाळा

हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) म्हणजे जलद गतीने केलेला व्यायाम हृदयावर अधिक दबाव टाकतो. त्यामुळे स्नायूंना अधिक ऑक्सिजनची गरज असते. या अतिरिक्त ऑक्सिजनसाठी शरीरावर अधिक ताण येतो, ज्यामुळे हृदय आणि श्वसन प्रणालीवर अधिक दबाव पडतो. यामुळे हृदयविकाराची समस्या असल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

First published:
top videos

    Tags: Heart Attack, Tips for heart attack