मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रेग्नन्सीमध्ये अति उष्णतेचा धोका; गर्भातील बाळापर्यंत पोहोचतात उन्हाचे चटके

प्रेग्नन्सीमध्ये अति उष्णतेचा धोका; गर्भातील बाळापर्यंत पोहोचतात उन्हाचे चटके

अति उष्ण तापमानाचा (High Temperatures) गर्भातील बाळावर दुष्परिणाम होत असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

अति उष्ण तापमानाचा (High Temperatures) गर्भातील बाळावर दुष्परिणाम होत असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

अति उष्ण तापमानाचा (High Temperatures) गर्भातील बाळावर दुष्परिणाम होत असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 06 नोव्हेंबर : प्रेग्नन्सी (pregnancy) म्हटलं की महिलेची पूरेपुर काळजी घेतली जाते. महिलेच्या आरोग्यासह तिच्या बाळाच्या (Baby) आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आई आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहिल असा आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करावा लागतो. फक्त आईच्या आरोग्याचा नाही तर आजूबाजूच्या वातावरणाचाही गर्भातील बाळावर परिणाम होत असतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार अगदी तापमानचाही गर्भात असलेल्या बाळावर दुष्परिणाम होऊ शकतो.

उच्च तापमानाच्या (high temperatures) प्रदेशात किंवा उष्णतेची लाट आलेल्या भागात राहणाऱ्या गर्भवती महिलांना वेळेपूर्वी किंवा मृत बाळ होण्याची शक्‍यता असते असं एका संशोधनात दिसून आलं आहे. या गोष्टी साधारणत गरिबीशी संबंधित असतात. मात्र आता जंगली भागात ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णतेच्या कारणामुळे अशा घटना वाढत आहेत. असं BMJ मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे.

गर्भावस्थेत असलेल्या महिलांच्या शरीरावर उष्णतेचा होणारा परिणाम मोजण्यासाठी जोहान्सबर्गमधील विट्स रिप्रॉडक्टिव हेल्थ आणि एचआयव्ही संस्थेच्या मॅक्यू चेरिश यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने 27 श्रीमंत, गरीब आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांचा आधीच झालेल्या संशोधनाचा सविस्तर अभ्यास केला.

गरोदरपणाच्या शेवटच्या काळात महिला जास्त तापमानाच्या संपर्कात आल्या तर preterm Birth म्हणजे बाळाच्या वेळेपूर्वी जन्म होण्याची शक्यता जास्त  वाढते, असं या संशोधनात दिसून आलं.  अगदी तापमानात काहीशा प्रमाणात झालेली वाढ सुद्धा महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकते. वेळेपूर्वी जन्म झालेल्या बाळांशी संबंधित 47 अभ्यासांपैकी 41 अभ्यासांत असं आढळलं की, जास्त तापमान असलेल्या ठिकाणी बाळाचा वेळेआधीच जन्म झाला होता. ही शक्यता सरासरी प्रमाणात एक डिग्री सेल्सिअसमध्ये पाच टक्क्यांनी वाढते आणि उन्हाळ्यात 16 टक्क्यांनी वाढते.

हे वाचा - Cramps आहेत पण Period नाही; मासिक पाळीसारख्या वेदना होण्याची 8 कारणं

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार दरवर्षी 15 दशलक्ष मुलं वेळेपूर्वी जन्मतात. त्यामुळे पाच वर्षांच्या आतच मृत्यू झालेल्या बाळांची संख्या सुद्धा जास्त आहे. अशा मृत्यूचं प्रमाण आफ्रिकेसारख्या उष्ण ठिकाणी जास्त आढळतं.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या शतकात पृथ्वीच्या तापमानात एक सेल्सिअसइतकी वाढ नोंदवली गेली आहे. यूएनच्या हवामान विज्ञान सल्लागार समितीने आयपीसीसीच्या म्हणण्यानुसार उष्ण प्रदेशात सर्वाधिक उष्ण दिवसांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. पॅरिस करारासंबंधित ग्लोबल वॉर्निंग 2C ऐवजी 1.5C पर्यंत मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. कारण या उष्णतेला दररोज 420 दशलक्ष लोकांना सामोरं जावं लागतं आहे, असं आयपीसीसीने 2018 च्या अहवालात म्हटलं आहे.

हे वाचा - पौष्टीक म्हणून अति खाऊ नका; जास्त अंडी खाणंही बेतू शकतं जीवावर

वाढलेलं प्रदूषण त्यामुळे उष्णतेत होणारी वाढ यामुळे वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांची संख्या वाढत चालली आहे. अति उष्णता ही लगेचच त्या गर्भावर परिणाम करते, असं संशोधकांनी सांगितलं आहे. तसंच गर्भवती महिलांनी उष्णतेच्या संपर्कात येणं टाळल्याने हा धोका टळू शकतो, असंही संशोधक म्हणाले.

First published:

Tags: Health, Pregnancy, Pregnant woman, Woman