मुंबई, 9 फेब्रुवारी : कोलेस्टेरॉल हा चरबी अर्थात फॅटचा एक प्रकार आहे. कोलेस्टेरॉल चिकट मेणासारखं असतं. कोलेस्टेरॉलमुळे शरीरात अनेक हॉर्मोन्स आणि पेशींची निर्मिती होत असते. तुम्हाला हे जाणून कदाचित आश्चर्य वाटेल की, जर कोलेस्टेरॉल शरीरात राहिलं नाही तर आपण जास्त काळ जगू शकणार नाही. कोलेस्टेरॉल हा मानवी शरीरातील खूप महत्त्वाचा घटक आहे.
मात्र कोलेस्टेरॉलचा एक प्रकार आपल्यासाठी खूप वाईट आहे. हा प्रकार रक्त वाहिन्यांमध्ये जमा होऊ लागला तर हृदयविकारासह हृदयाशीसंबंधित अनेक आजार होतात. कोलेस्टेरॉल शरीरात टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेनसह अनेक हार्मोन्सची निर्मिती करतं. या शिवाय मेटाबॉलिझम अर्थात चयापचय क्रिया वाढवण्यासाठी कोलेस्टेरॉलची गरज असते. अत्यंत फायदेशीर असूनही काही वेळा कोलेस्टेरॉलमुळे जीव धोक्यात येतो.
कोलेस्टेरॉल वाढल्यास दिसत नाहीत लक्षणं! फक्त या पद्धतीनेच ओळखू शकता
वास्तविक कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. पण जर एलडीएल अर्थात बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर ते आपल्यासाठी शत्रू बनतं. बॅड कोलेस्टेरॉल अत्यंत गुप्तपणे शरीरावर हल्ला करते. शरीरात असे काही संकेत दिसत असतील तर त्याआधारे तुम्ही कोलेस्टेरॉलमुळे शारीरिक समस्या निर्माण होणार आहेत, असा अंदाज लावू शकता. हे संकेत नेमके कोणते असतात, त्याविषयी जाणून घेऊया.
हे आहेत कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत
1. हात-पाय सुजणं, बधिरपणा येणं : टीओआयच्या वृत्तानुसार, जेव्हा शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढते, तेव्हा त्याचा परिणाम हात आणि पायांवर दिसू लागतो. बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याने हाता-पायांमध्ये रक्तपुरवठा कमी होऊ लागतो. त्यामुळे नसांचा रंग बदलू लागतो आणि त्यामध्ये सूज आणि बधिरपणा येऊ लागतो. यामुळे तीव्र वेदना जाणवू लागतात. हात-पाय अशक्त होऊ लागतात.
2. त्वचेवर रॅशेस येणं : बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चिकट पदार्थ जमा होऊ लागतो. त्यामुळे त्वचेवर पुरळ येतात. शरीरावर अनेक ठिकाणी ही पुरळ दिसून येतात. तसंच डोळ्यांखाली, पाठीमागे, पायात आणि तळहातावर फुगल्यासारखे दिसते.
3. नखं खराब होऊ लागतात : जेव्हा रक्तात मोठ्या प्रमाणावर कोलेस्टेरॉल जमा होऊ लागतं, तेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे शरीरातील विविध अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. नखांवरदेखील याचा परिणाम दिसून येतो. यामुळे नखांवर गडद रेषा दिसू लागतात. नखं खराब होऊन निघू लागतात. नखं पातळ आणि फिकट होतात.
4. डोळ्यांजवळ पिवळे डाग येणं : कोलेस्टेरॉल वाढल्याने डोळ्यांजवळ पिवळे डाग दिसू लागतात. कोलेस्टेरॉल प्रमाणापेक्षा जास्त वाढले तर हे डाग नाकापर्यंत पोहोचतात. याला जेंथेप्लाझ्मा पलपेब्रारम (एक्सपी ) म्हणतात.
कॅन्सर झाल्यास पुरुषांमध्ये दिसतात ही लक्षणं, या छोट्या त्रासांकडेही करू नका दुर्लक्ष
कोलेस्टेरॉल वाढू नये यासाठी काय काळजी घ्याल?
कोलेस्टेरॉल वाढू नये यासाठी वयाच्या 20 व्या वर्षापासून सकस आहार घ्यावा. धूम्रपान, मद्यपान, प्रक्रियायुक्त पदार्थ, पिझ्झा, बर्गर, पॅकेटबंद पदार्थांचं सेवन मर्यादित प्रमाणात ठेवावं. सिझनल हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, फळांचा आहारात समावेश करावा. नियमित व्यायाम केल्याने गुड कोलेस्टेरॉल अर्थात एचडीएल वाढते. तळलेले पदार्थ, धूम्रपान, मद्यपान वर्ज्य केल्यास गुड कोलेस्टेरॉल वाढू शकते. जर गुड कोलेस्टेरॉल कमी झाले तर औषधांच्या माध्यमातून ते वाढवण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle